Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

गायमुख जकात नाक्याजवळील गायमुख घाट उतरणीवर आज सकाळी भीषण अपघात झाला असून सुमारे 11 वाहनांचं यात नुकसान झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 09, 2026 | 12:34 PM
Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी
Follow Us
Close
Follow Us:
  • गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात
  • 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी
  • पोलीसांचा तपास जारी
ठाणे  : मुंबई – सुरत महामार्गालगत ठाणे परिसरातील महत्वाचं ठिकाण म्हणजे गायमुख घाट. या ठिकाणाहून बऱ्याच मोठ्या वाहनांची ये जा सुरु असते. मालवाहून नेणारे अवजड वाहनं देखील याच ठिकाणाहून जात असतात. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विकसित करावा अशी मागणी स्थानिकांची कित्येक दिवसांपासून सुरु आहे. या ठिकाणी वरचेवर किरकोळ तर कधी गंभीर स्वरुपाच्या अपघाताचं सत्र सुरुत असतं. मात्र आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने मोठं नुकसान देखील झालं आहे.

गायमुख जकात नाक्याजवळील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीच्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. ठाण्याच्या दिशेने येणारा MH 04 KF 0793 क्रमांकाचा कंटेनर विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या एकूण 11 वाहनांना धडकला. या अपघातात चार जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सकाळी साडेसात वाजता या घटनेची माहिती प्राप्त झाली.या अपघाताच्या घटनेची माहिती भालेराव यांनी दिली. कंटेनरमध्ये अंदाजे 35 ते 40 टन सिमेंट गोण्या भरलेल्या होत्या. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

Nagpur Crime: क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला, दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला

या अपघातात रिक्षाचालक शिवकुमार यादव (वय 56 ) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रिक्षामधील प्रवासी तस्किन शेख (वय 45 ) व अनिता पेरवाल (वय 45 ) यांना चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, कारचालक रामबली बाबूलाल (वय 22 ) यांना कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. या चौघांनाही ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलीसांनी दिली.

अपघातात होंडा सिटी, व्हॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोव्हा, डिझायर, सुझुकी ब्रेझा, फोर्ड कार तसेच एक ऑटो रिक्षा अशा एकूण 11 वाहनांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने घसरणीचा धोका निर्माण झाला होता.

घटनेनंतर कासारवडवली पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांडलेल्या ऑईलवर माती टाकून रस्ता सुरक्षित करण्यात आला. अपघातामुळे घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती.सध्या सर्व अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून, घोडबंदर रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. अपघाताच्या कारणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…

 

Web Title: Thane accident case terrible container accident at gaimukh ghat 11 vehicles damaged 4 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Case
  • highway news
  • Thane news

संबंधित बातम्या

ना इंडिकेटर, ना ब्रेक लॅम्प चालू! PMP ची दुरावस्था कधी संपणार? वाहनचालकांना कल्पना न आल्याने…
1

ना इंडिकेटर, ना ब्रेक लॅम्प चालू! PMP ची दुरावस्था कधी संपणार? वाहनचालकांना कल्पना न आल्याने…

Kolhapur News : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच; सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी
2

Kolhapur News : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच; सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू
3

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात
4

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.