पुण्यातील टोळी युद्ध भडकले
पुण्यात घडले गॅंगवॉर
नाना पेठेत तरुणाची हत्या
पुणे पोलिसांकडून तपास सुरू
पुणे/अक्षय फाटक: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाला वर्षपुर्ण होते नव्हे तोवर कुख्यात आंदेकर टोळीने रचलेला बदल्याचा ‘डाव’ अखेर यशस्वी ठरत बंडू आंदेकरचा जावई तसेच वनराजच्या खूनातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाचा राहत्या घराच्या दारात गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणूकीच्या गर्देत हा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुण्याच्या नाना पेठ व आसपासच्या परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद (वय २२) याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. तर, एकजन जखमी झाला आहे. ही घटना नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्सच्या गेटवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. दरम्यान, गोळ्या झाडून आंदेकर टोळीतील आरोपी पसार झाल्याची माहिती आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्याच्या मध्यभागात रात्री साडे नऊच्या सुमारास सोमनाथ गायकवाड तसेच बंडू आंदेकर यांची मोठी मुलगी संजीवनी तसेच तिचा पती जंयत कोमकर, त्याचे भाऊ प्रकाश व गणेश कोमकर यांनी कटरचून गोळ्या झाडत व कोयत्याने सपासप वारकरून खून केल्याची घटना घडली होती. यानंतर पुण्यातील हे खून सत्र पुढेही सुरूच राहिल असे भाकित वर्तवले जात होते. रिप्लाय म्हणून आंदेकर टोळीकडून कोणाचा तरी गेम केला जाईल असे सांगितले जात होते. वर्षानंतर आंदेकर टोळीने खूनाचा बदला म्हणून पहिली गेम ही कोमकर कुटूंबियातील गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद याचा गोळ्या झाडून खून केला.
कोमकर कुटूंबिय नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्स या इमारतीत राहण्यास आहे. शुक्रवारी आठच्या सुमारास गोविंद हा त्याच्या एका मित्रासोबत इमारतीच्या खाली थांबलेला होता. तेव्हा दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी थेट गोविंदवर गोळ्या झाडत त्याचा खून केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. दरम्यान, भर वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला गेल्याने मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली.
आंदेकरांच्या खुनाचा बदला थांबला, पोलिसांनी टोळीचा गेमच उधळला; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
टोळी युद्धातून नातवाचा जीव घेतला
आंदेकर-गायकवाड टोळी युद्धाचा बळी आंदेकर यांचा नातू ठरला गेला आहे. गणेश कोमकर याला बंडू आंदेकर यांची लहान मुलगी आहे. गणेशला दोन मुले आहेत. त्याचा मोठा मुलगा हा गोविंद होता. आंदेकर गँगकडून त्यालाच टार्गेट करण्यात आले आणि त्याचा जीव घेतला गेला.
ऐन विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येला खून
चौकट
टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद (वय २२) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.