Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : सत्ताधारी सपशेल अपयशी, टक्केवारीच्या नादात ठाण्यातील प्रकल्प रखडले ; राजन विचारे यांचा आरोप

सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 29, 2025 | 02:46 PM
Thane News : सत्ताधारी सपशेल अपयशी, टक्केवारीच्या नादात ठाण्यातील प्रकल्प रखडले ; राजन विचारे यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : नवीन ठाणे स्टेशन, सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपशेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली आहे.

शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्प या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरचे टाकण्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली. तसेच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढवा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याने विचारे यांनी खंत व्यक्त केली. कारण शिंदे गटाचे राजकारण फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला.

Thane News : ठाणे मनपा अ‍ॅक्शनमोडवर ; अनधिकृत इमारतींची नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम

वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

4.50 मीटर च्या पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्याचत आले आहेत. त्यावर स्टील काँक्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Thane News : खासदार नरेश म्हस्के यांना `संसद रत्न’ पुरस्कार प्रदान; नवी दिल्लीत पार पडला पुरस्कार सोहळा

प्रकल्पाची थोडक्यात माहिती

प्रकल्पाला सण2018 साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला. 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटी ला मान्यता मिळाली. दिल्लीच्या आयआरडीसी विभागाकडूनही मंजुरी मिळवून घेतली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू झाले.

या मार्गावर 59 पिलर उभे करण्यात आले. परंतु गेल्या वर्षभरापासून ब्लॉक घेण्यासाठी रेल्वे कडे पाठपुरावा नसल्याने गर्डर टाकण्यास विलंब लागला होता. सध्याचे खासदार संसदेत फोटो काढण्यात व्यस्त आहेत बहुतेक त्यांना विकास कामांकडेही लक्ष देण्यास वेळ नसावा असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला आहे.

Web Title: Thane news projects in thane stalled over percentage rajan vichare accuses the ruling party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत
1

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण
2

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना
3

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात
4

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.