Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : गरजू विद्यार्थ्यांना शिंदेगटाचा मदतीचा हात; शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य

इंजिनियरिंग, डॉक्टर व तत्सम उच्च महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील  दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५१ लाखांचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन दिले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 24, 2025 | 03:04 PM
Thane News : गरजू विद्यार्थ्यांना शिंदेगटाचा मदतीचा हात; शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : इंजिनियरिंग, डॉक्टर व तत्सम उच्च महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील  दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५१ लाखांचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी आनंद आश्रमात उपस्थित राहून यासाठी सहकार्य करणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मंडळाचे संचालक डॉ. अजगर मुकादम यांचे आभार मानले.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेले एक महत्त्वाचे मंडळ आहे. या मंडळाचा उद्देश अल्पसंख्यांक समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण, उद्योगधंदा आणि स्वयंरोजगाराकरता कमी व्याज दराने अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना व तरुणांना योग्य संधी मिळावी, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. युती शासनाच्या काळात या मंडळाला विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ठाण्यात देखील या महामंडळाचे दोन महिन्यांपूर्वी राबोडी येथे कार्यालय सुरू झालं आहे. तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे नेते नजीब मुल्ला हेही उपस्थित होते. ठाण्यासह कोकण परिसरातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना व युवकांना या योजनेचा मोठा फायदा होत असून आजवर करोडो रुपयांचे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना झाले असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

या मंडळाच्या कामकाजात शिवसेनेचे डॉ. अजगर मुकादम यांची संचालकपदी नियुक्ती ही एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यांच्या प्रयत्नांना खासदार नरेश म्हस्के यांचा ठाम पाठिंबा असून, नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नुकतीच ५१ लाख ४३ हजार ६०० रुपयांची आर्थिक तरतूद शिक्षणाकरिता करण्यात आली आहे. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून, अल्पावधीतच त्यांना याचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे इंजिनियरिंग, डॉक्टरकी, महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना या माध्यमातून कर्ज देण्यात आल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

गणेशमूर्तीला सजीव करणारे डोळे रेखाटणे बनतंय एक आव्हान; मूर्तीचे रंगकाम जबाबदारी आणि जोखमीचे

हे सगळं युती सरकारच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक आहे. कारण याआधीच्या काँग्रेस शासनकाळात अल्पसंख्यांकांसाठी केवळ मतांच्या राजकारणापुरतीच भूमिका निभावली गेली. त्यांच्या खरी प्रगती आणि आर्थिक विकासाकरिता कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पण आजच्या युती शासनाने अल्पसंख्यांक समाजाला केवळ आश्वासनं न देता, प्रत्यक्ष कृतीतून मदत उपलब्ध करून दिली आहे. अल्पसंख्यांक तरुणांच्या हातात शिक्षणाचे आणि रोजगाराचे सामर्थ्य देऊन त्यांना समाजाच्या प्रगतीच्या प्रवाहात आणणे हा खरा उद्देश आहे आणि या कामगिरीमुळे भविष्यातही अनेकांना उज्ज्वल वाटचालीची संधी मिळणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल

यापुढेही ठाण्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण, उद्योगधंदा आणि स्वयंरोजगाराकरता दर महिन्याला अर्थसहाय्य मिळण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनखाली सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करू असे डॉ. अजगर मुकादम यांनी यावेळी सांगितले. या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतलेल्या सर्व मुलांनी खासदार नरेश म्हस्के आणि डॉ. अजगर मुकादम यांचे मन:पूर्वक आभार मानले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक ठाणे अभिषेक रामनाथ जाधव, ठाणे लिपिक टंकलेखक प्रशांत कदम, ठाणे लिपिक टंकलेखक हैदर शेख उपस्थित होते.

Web Title: Thane news shinde groups helping hand to needy students shiv senas efforts provide financial assistance of rs 51 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Naresh Mhaske
  • Thane news

संबंधित बातम्या

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
1

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
2

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
4

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.