Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यातील शास्त्रीनगरमध्ये अनधिकृत गाळे आणि चाळ बांधणी सुरूच, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली करत ठाण्यातील शास्त्रीनगर मध्ये अनधिकृत गाळे आणि चाळ बांधणी सुरूच असल्याचे दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 13, 2025 | 04:40 PM
ठाण्यातील शास्त्रीनगर मध्ये अनधिकृत गाळे आणि चाळ बांधणी सुरूच, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली

ठाण्यातील शास्त्रीनगर मध्ये अनधिकृत गाळे आणि चाळ बांधणी सुरूच, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे शहरातील शास्त्रीनगर परिसरात ठाणे महापालिकेचे महत्त्वाचे मोकळे भूखंड अनधिकृत गाळे व चाळी उभारून भूमाफियांनी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण व निष्कासन विभागाने या आदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत भूमाफियांना मोकळे रान दिल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केला आहे.

ठाण्यातील शास्त्रीनगरमधील हे भूखंड महत्त्वाच्या ठिकाणी असून त्यावर जेष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, तसेच डीपी रोडचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक वर्क ऑर्डरही जारी झालेली आहे. तरीदेखील, महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भूमाफियांनी अनधिकृत गाळे व चाळी बांधण्याचे काम सुरू केले. विशेषतः मोठ्या नाल्यालगत ही बांधकामे सुरू असून भविष्यात दुर्घटना घडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Ujjwal Nikam News : उज्ज्वल निकम यांना पंतप्रधान मोदींचा फोन; शुभेच्छा देताना विचारले मराठीत बोलू की हिंदीत?

या परिस्थितीविरोधात स्थानिक नागरिक आणि हणमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये लोकमान्य नगर – सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनीही दूरध्वनीवरून ठाणे महापालिका प्रशासनाला अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. परंतु अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी हे आदेश पायदळी तुडवत कारवाई टाळली आहे.

नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे परतीच्या प्रवासात उत्साहात स्वागत; परिसर बनला भक्तिमय

हणमंत जगदाळे यांनी पालिका प्रशासनावर घणाघात करत सांगितले की, अशा प्रकारे राजकीय दबावाखाली किंवा भ्रष्टाचाराच्या जोरावर महत्त्वाचे भूखंड गमावले गेले, तर शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल. त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर लवकरात लवकर अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही, तर स्थानिक नागरिकांसह पुन्हा एकदा प्रभाग समिती व महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच भूमाफियांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या भूमाफियांशी असलेल्या कथित संगनमताचे गंभीर संकेत मिळत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Web Title: Thane news unauthorized construction of granaries and chawls continues in shastrinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगावच्या ‘या’ दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
1

Ahilyanagar News: शेवगावच्या ‘या’ दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन
2

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस
3

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?
4

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.