Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander : महापौर पदाच्या निवडणुकीवरुन गदारोळ; “टोपेबाज लोकांपासून सावध राहा” शिंदेगटाची जहरी टीका

मिरा-भाईंदर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या भूमिकेवर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 02, 2026 | 07:25 PM
Bhayander : महापौर पदाच्या निवडणुकीवरुन गदारोळ; “टोपेबाज लोकांपासून सावध राहा” शिंदेगटाची जहरी टीका
Follow Us
Follow Us:
  •  महापौर पदाच्या निवडणुकीवरुन गदारोळ;
  • “टोपेबाज लोकांपासून सावध राहा” शिंदेगटाची जहरी टीका
भाईंदर/ विजय काते: मिरा-भाईंदर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या भूमिकेवर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. “मराठीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या टोपेबाज लोकांपासून जनतेने सावध राहावे,” असा थेट इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना 146 विधानसभा मतदारसंघ प्रमुख सचिन मांजरेकर आणि शिवसेना प्रभाग 14 प्रभारी संतोष गोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत गोवर्धन देशमुखांवर जोरदार टीका केली. “मराठी महापौर झाला नाही तर रक्तरंजित राजकारण करू,” असा इशारा देणारे देशमुख प्रत्यक्षात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या इशाऱ्यावर नाचणारे ‘तटाखालचे मांजर’ असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला.

मराठीच्या नावाखाली ‘डबल गेम’
सचिन मांजरेकर यांनी आरोप केला की, महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अमराठी उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात उबाठा आणि मनसेचे मराठी उमेदवार उभे करण्यात आले. या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप मराठी एकीकरण समितीच्या कार्यालयातूनच झाले, असा गंभीर दावा त्यांनी केला.“राजू भोईर, पूजा आमगावकर, राजू वैतोस्कर यांसारख्या खऱ्या मराठी उमेदवारांचा पराभव घडवून आणणारा माणूस आज मराठी अस्मितेच्या गप्पा कशा काय मारतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील सहा भाजप उमेदवारांचा पराभव, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला पराभव

भाजपच्या 36 मराठी नगरसेवकांवर मौन का?
“भाजपचे 36 नगरसेवक मराठी असताना त्यांना जाब विचारण्याऐवजी शहरात गोंधळ घालून वातावरण दूषित केले जात आहे,” अशी टीकाही शिवसेनेने केली.आंदोलनामागचा ‘स्पॉन्सर’ कोण?संतोष गोळे यांनी आंदोलनाच्या वेळेवर संशय व्यक्त करत, “महापौर पदासाठी अर्ज दाखल होताच हे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून सुरू झाले? यामागचा स्पॉन्सर कोण आहे?” असा सवाल केला. काही महिन्यांपूर्वी देशमुख स्थानबद्ध असताना त्यांना सोडवण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक पुढे आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

रुबीना शेख मराठीच – धार्मिक तेढ नको
महापौर पदाच्या उमेदवार रुबीना फिरोज शेख या मूळच्या मराठी मुस्लिम कुटुंबातील असून त्या मराठीच असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. त्यांच्या नावावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहरातील शांतता बिघडवून मराठीच्या नावाखाली स्वतःचे राजकारण थांबवावे, अन्यथा जनता योग्य धडा शिकवेल, असा थेट इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

Web Title: Bhayander uproar over mayoral election beware of the top notch people shinde groups venomous criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Bhayander
  • Marathi News

संबंधित बातम्या

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर
1

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
3

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
4

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.