Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला गालबोट

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील राजकीय वातावरण तापलं असल्याची माहिती समोर येत आहे. दसरा मेळाव्याचं बॅनर फाडलं असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे साईनाथ तारे यांनी विरोधकांवर हल्लोबोल केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2024 | 06:38 PM
कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला गालबोट

कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला गालबोट

Follow Us
Follow Us:

कल्याण – विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच पक्षात चढाओढ सुरु आहे. अशातच आता कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्यासाठीचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले होते. मात्र दुर्गाडी चौकात त्यांनी लावलेले भले मोठे बॅनर काही अज्ञातांनी फाडल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तारे यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आतापासूनच विरोधकांनी आमचा धस्का घेतला आहे, म्हणूनच त्यांनी हे घा णेरडे राजकरण सुरू केले. मात्र त्यांना हे कळत नाही की, अशा वागणूकीने कधी निवडणुका जिंकता येणार नाही. अशा कठोर शब्दांत तारेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा- “महायुतीच्या सरकारमुळे कणकवली स्मार्ट होणार”, नितेश राणे यांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. तारे यांनी दुर्गाडी चौकात शिवसेनेचा शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. हे बॅनर दुपारच्या सुमारास फाडल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच तारे यांनी काढलेल्या बॅनरची पाहणी केली.

हेही वाचा- मोठी बातमी! ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आतापर्यंत ५ महिन्यांचे पैसे खात्यात जमा

दुर्गाडी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बॅनर नव्हता यामुळेच मी दसरा मेळाव्याचे जाहिरात करणारे अधिकृत बॅनर लावले होते. या मोठ्या बॅनरमुळे लोकांचे लक्ष या बॅनरकडे वेधले जात होते. विरोधकांनी तारे मामांचा इतका धक्का घेतला आहे की त्यांनी बॅनरच पाडले आहे. इतक्या घाणेरड्या प्रकारचे राजकारण केले जाऊ नये. दसरा मेळावा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला असून या बॅनरवर बाळासाहेबांचा भला मोठा फोटो होता. बॅनर फाडून विरोधकांनी बाळासाहेबांच्या फोटोची विटंबना केली आहे. शहरात बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे मात्र विकृत विचार बुद्धीच्या लोकांनी हा जो प्रकार केला आहे तो निंदनीय आहे या गोष्टीची मी निंदा करतो अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे साईनाथ तारे यांनी दिली आहे. तसंच याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Web Title: A spark of political controversy in kalyan thackeray groups dussehra rally banner was smashed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 06:38 PM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
1

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश
2

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
4

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.