Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले वचन, मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

कल्याण पश्चिममध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 बेडचे अतिशय अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत सुसज्ज रुग्णालयाचे कल्याणकरांना आश्वासन दिले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 06, 2024 | 01:30 PM
कल्याणकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले वचन, मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : एकीकडे विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे. कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे. कल्याण पश्चिममध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 बेडचे अतिशय अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. हे हॉस्पीटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर, तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांचा सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुसज्ज रुग्णालयाचे कल्याणकरांना आश्वासन दिले होते.

वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येला अपुरे पडणारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय पाहता शहरासाठी एका सुसज्ज आणि अद्ययावत शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती. ही गरज ओळखून आमदार विश्वनाथ भोईर यांनी निवडून आल्यापासुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केडीएमसी प्रशासनाला असे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले. आणि मग केडीएमसी प्रशासनानेही वेळ न दवडता त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली. रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून गौरीपाडा परिसरात तीनहून अधिक मजल्यांची बांधून तयार इमारत केडीएमसीला प्राप्त झाली आहे. याठिकाणी पीपीपी तत्त्वावर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून इतर सर्व अद्ययावत सुविधांसह हृदय विकारावरील उपचारांसाठी सुसज्ज अशी कॅथलॅबही उभारण्यात येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली होणार आहे.

कल्याणकरांना एक चांगले रुग्णालय देऊ शकलो याचा आनंद – आमदार विश्वनाथ भोईर

गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडावर ही तीन मजली इमारत बांधण्यात आली असून याठिकाणी16 हजार स्क्वेअर फुटांहून अधिक भव्य जागेवर 100 बेडचे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहतेय याचा मनस्वी आनंद होत आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आपण सुसज्ज रुग्णालयाचे आश्वासन दिले होते. या रुग्णालयाच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

या रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत (आयुष्मान भारतअंतर्गत पात्र लाभार्थी) सर्व आजारांवर मोफत तर त्यात न बसणाऱ्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत. यासाठी केडीएमसीकडून संबंधित भागीदाराला ही इमारत देण्यात येणार असून त्यांच्याकडून या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहितीही केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी , माजी नगरसेवक गणेश जाधव, डॉ. धीरज पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, विभागप्रमुख अंकुश केणे, शाखाप्रमुख अशोक भोईर आणि केडीएमसीचे माजी उपआयुक्त प्रकाश गव्हाणकर उपस्थित होते.

Web Title: Chief minister eknath shinde has kept his promise kalyankars will soon get a super specialty hospital mla vishwanath bhoir pursuit of success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.