Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

डोंबिवलीच्या पाटीदार भवनमध्ये २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान श्रीमद भागवत सप्ताह पार पडला. प. पू. भगवती जयश्री देवींच्या प्रवचनासह पर्यावरणपूरक होळी आणि दीप रांगोळीने वेधले लक्ष.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 09:41 PM
डोंबिवलीत 'भागवत सप्ताहा'चा भक्तीमय सोहळा संपन्न (Photo Credit- X)

डोंबिवलीत 'भागवत सप्ताहा'चा भक्तीमय सोहळा संपन्न (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तिमय सोहळा संपन्न
  • पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांची रांगोळी ठरली आकर्षणाचे केंद्र
डोंबिवली | ५ मार्च २०२६: डोंबिवली पूर्वेतील पाटीदार भवन येथे २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ‘श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ’ अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सात दिवसांच्या सोहळ्याने संपूर्ण पाटीदार भवन भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. या अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन श्री कच्ची कडवा न्याती ट्रस्ट (मुंबई) आणि डोंबिवलीतील विविध पाटीदार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

दिग्गज संतांची उपस्थिती आणि रसाळ प्रवचन

या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे जगद्गुरु द्वाराचार्य श्री कबीर रवी भान संप्रदायाचे आचार्य (कच्छ) यांची लाभलेली विशेष उपस्थिती. भागवत कथेचे रसाळ निरूपण प. पू. भगवती जयश्री देवी (कच्छ) यांनी केले. त्यांच्या अमृतवाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

नियोजन आणि सजावटीचा थाट

कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. अनिल पासट यांनी पाटीदार भवनला आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने भव्य स्वरूप दिले होते. गौरव केटर्स यांच्यामार्फत भाविकांसाठी चहा-पाणी आणि सात्विक भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती. संस्थेच्या आजी-माजी ट्रस्टींनी या सोहळ्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि सूक्ष्म नियोजन केले होते.

पर्यावरणपूरक संदेश: ‘गोमय’ होळी आणि दीप रांगोळी

पुढच्या पिढीसमोर एक आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने या सप्ताहात काही विशेष उपक्रम राबवण्यात आले:

१. पर्यावरणपूरक होळी: नैसर्गिक हानी टाळण्यासाठी केमिकलमुक्त आणि केवळ ‘गोबर’ (शेणाच्या गोवऱ्या) पासून तयार केलेल्या होळीचे दहन करण्यात आले.
२. दीप रांगोळी: मातीच्या शेकडो दिव्यांपासून साकारलेली रांगोळी सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या अभिनव प्रयोगाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

आयोजक संस्था

या भव्य आयोजनात श्री कच्ची कडवा न्याती ट्रस्ट मुंबई, श्री कच्ची कडवा पाटीदार समाज डोंबिवली, श्री पाटीदार युवक मंडळ, श्री कच्ची कडवा महिला मंडळ आणि भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ आयोजन समिती, डोंबिवली यांचा मोलाचा सहभाग होता.

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Web Title: Devotional ceremony of bhagwat saptah concluded in dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • dombivali news
  • holi
  • Marathi News

संबंधित बातम्या

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!
1

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली
2

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
3

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?
4

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.