"राजकारण नको मात्र आरोपीला कठोर शिक्षा व्हावी";' मराठी कुटुंब मारहाणप्रकरणी काय म्हणाले विश्वनाथ भोईर
कल्याणच्या उच्च सोसायटीत एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा धक्कदायक प्रकार नुकताच घडला आहे. “तुम मराठी लोग गंदे हो” असं म्हणत अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने बाळकृष्ण काळवीट्टे यांच्य़ाशी भा़ंडण करुन त्यांना अपशब्द वापरले. हा वाद पुढे इतका चिघळला की, मराठी माणसं घाणेऱडी आहेत असं शुक्ला यांनी म्हटलं. झालेला प्रकार कल्याण आणि परिसरात पसरला त्यामुळे त्यामुळे सर्व मराठी बांधव एकत्र येत कल्याणमध्ये या प्रकरणावर तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, कल्याणच्या योगीधाम परिसरात घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. कल्याणात झालेल्या या प्रकाराने आपण आश्चर्यचकित झालो असून याप्रकरणी राजकारण करू नका. मात्र संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी याप्रकरणी स्पष्ट केले आहे.
कल्याण हे सर्व जातीधर्मांना एकत्रित सांभाळून चालणारे ऐतिहासिक शहर असून इथे अशी घटना घडते. मात्र त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये यातील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. कल्याणातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेला हा प्रकार बघून आपण आश्चर्यचकित झालो आहोत, अशाठिकाणी असा प्रकार करणारे ज्या प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे आणि कठोरात कठोर शिक्षा होणे हे गरजेचे असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले. तर पोलिसांनी आजच्या दिवसात त्या सर्व आरोपींना अटक करावी. अन्यथा उद्या आपण हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा इशाराही आमदार भोईर यांनी दिला आहे. तर हे प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून सर्व समाजातील लोकांनी शांतता पाळावी, शहरातील शांततेला गालबोट लागेल असं काही करू नये असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
BJP Vs Congress : मुंबईत काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं, Video व्हायरल
बाळकृष्ण काळवीट्टे आणि अखिलेश शुक्ला यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. यादरम्यान रागातच्या भरात अखिलेश यांनी मराठी माणसं घाणेरडी आहेत असे अपशब्द वापरले. अखिलेश यांनी तुम साला मराठी आदमी गंदे हो, तुम मांस मच्छी खाते हो, तुम्हारी लायकी नही है हायसोसायटी में रहने की. असे अपशब्द शुक्ला यांनी वापरले. त्यानंतर घटनेचे तीव्र पडसाद कल्याण आणि परिसरात उमटाताना दिसत आहे. यासंर्भात आता सखोल चौकशी सरुु हे तसंच .जो गुन्हा दाखल झाला त्याची तपासणी करू.दोन आरोपीला ताब्यांत घेतले.सोशल मीडियाचे काही व्हिडीओ अमच्या कडे आले त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. असं कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं आहे.