Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

गणेशोत्सवात मोदक आणि मिठाईच्या खरेदीला गर्दी वाढली आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे मिठाईचे भाव सुमारे ३५ टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 16, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा बसणार फटका
  • गणेशोत्सवात कोणत्या मोदकांना सर्वाधिक मागणी आहे
  • अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीचा मिठाई व्यवसायावर काय परिणाम झाला?
 

गणपती बाप्पांच्या आगमनाने बाजारपेठा सजल्या असून, मोदक आणि मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या ताटावरही महागाईचा परिणाम दिसून येत आहे. साखर, दूध, तेल आणि इतर कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे मिठाईचे दर वाढले असून, ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.

गणपती बाप्पांचे आगमन घरोघरी झाले असून त्यांच्या नैवेद्याला महागाईची झळ बसली आहे. साखरेसह तेल, दूध आणि इतर साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे मिठाईचे भाव सुमारे ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे दरवर्षी किलोभर मिठाई खरेदी करणाऱ्या नागरिकांना यंदा पावशेरवर समाधान मानावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात प्रसाद खरेदी करणाऱ्या भाविकांनीही खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोदक अन मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक, पेढे आणि विविध मिठाई खरेदी केली जात आहे.

Ganeshotsav: शंखनाद, ओंकार जप अन् ‘मोरया’चा गजर; दगडूशेठ गणपती मंडपात ३५ हजार महिलांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण

किलोभर मिठाईची जागा घेतली पाव किलोने

मात्र, वाढत्या दरांमुळे खरेदीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पूर्वी पाच ते दहा किलो प्रसाद घेणारे भाविक आता दोन ते तीन किलोवर आले आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी किलोभर मिठाई घेणारे ग्राहकही पावशेर किंवा अर्धा किलो खरेदी करत आहेत.

मिठाई उत्पादकांकडून घेतली जाते खबरदारी

मिठाईतील भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांवर प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने व्यावसायिकांमध्येही खबरदारीचे वातावरण आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमुळे मिठाई उत्पादक दर्जेदार साहित्य वापरण्यावर भर देत आहेत.

भाव वाढले तरी श्रद्धेने घेतात मिठाई

प्रसादाचे व मिठाईचे किलोमागे २० ते ४० रुपयाने भाव वाढले असले तरी श्रद्धा असल्याने ग्राहक येत आहेत. पण जे ग्राहक एक किलो प्रसाद किंवा मिठाई घेऊन जात होते, ते आता फक्त पावशेर ते अर्धा किलो घेऊन जात आहेत, असे येथील एका मिठाईच्या दुकानदारांनी सांगितले.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

उकडीच्या मोदकांना पसंती

उकडीच्या मोदकांना यंदाही मोठी मागणी आहे. मोदक करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागत असल्याने अनेक महिला तयार मोदक खरेदी करण्यास पसंती देत आहेत. नागरिकांच्या आवडीनुसार मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. मावा, केशरी, मँगो, चॉकलेट, सुकामेवा, डाएट, शुगर फ्री, गुलकंद-पान आणि वेलची मावा मोदकांना मागणी आहे. तळलेले मोदकही खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ganeshotsav 2026 modak demand sweets price rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Ganapati Festival
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा
1

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण
2

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण

‘1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी’; ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ देतोय मोलाचा संदेश
3

‘1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी’; ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ देतोय मोलाचा संदेश

Ganeshotsav: शंखनाद, ओंकार जप अन् ‘मोरया’चा गजर; दगडूशेठ गणपती मंडपात ३५ हजार महिलांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण
4

Ganeshotsav: शंखनाद, ओंकार जप अन् ‘मोरया’चा गजर; दगडूशेठ गणपती मंडपात ३५ हजार महिलांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.