सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते.
गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने शहरातील हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले. यावर्षी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापनेचे ४२ वे वर्ष साजरे होत असून, हा सलोख्याचा वारसा अधिक दृढ…
महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत हे दुःखद आहे. गणेशोत्सवावर खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा एक भाग शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजूला ठेवता येत नाही का?
पुण्यातील लोकप्रिय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटामध्ये विराजमान झाला आहे. यावेळी जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी व गणेश मंडळांच्या सर्वानुमते या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.