Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यापूर्वी शहर सज्ज ठेवा, हरित आच्छादने आणि पाणपोयींची सुविधा करा ; “सौरभ राव यांचा महापालिकेला आदेश

उन्हापासून बचाव होण्यासाठी मोठ्या सिग्नलपाशी लावण्यात आलेली हरित आच्छादने आणि तात्पुरत्या पाणपोई यांच्याबद्दल नागरिकांनी ठाणे महापालिकेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2025 | 04:37 PM
पावसाळ्यापूर्वी शहर सज्ज ठेवा, हरित आच्छादने आणि पाणपोयींची सुविधा करा ; “सौरभ राव यांचा महापालिकेला आदेश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : उन्हापासून बचाव होण्यासाठी मोठ्या सिग्नलपाशी लावण्यात आलेली हरित आच्छादने आणि तात्पुरत्या पाणपोई यांच्याबद्दल नागरिकांनी ठाणे महापालिकेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, आवश्यकतेनुसार या दोन्ही सुविधांची संख्या वाढवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरण विभाग यांना दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, गतवर्षीपासून महापालिकेतर्फे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात येतात. यंदाही अशा २५ पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे, स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून ही संख्या वाढवण्यात यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

तसेच, तीन हात नाका (२), अल्मेडा चौक (०१) खोपट (२), नितीन कंपनी (१) या सहा ठिकाणी वाहनचालकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी हरित आच्छादनांची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. आता ठाणे महापालिका क्षेत्रात जिथे ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळेचा सिग्नल आहे, अशा ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमाची प्रगती, उष्णतेच्या लाटेबाबतच्या उपाययोजना, स्वच्छ सर्वेक्षण, इ-ऑफिस कार्यप्रणालीची अमलबजावणी आदी विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालय येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतला. कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उमेश बिरारी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, सचिन सांगळे, मधुकर बोडके, अनघा कदम, पद्मश्री बैनाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

पावसाळ्याच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने होत असलेली झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया, तसेच खड्डेमुक्त ठाणे मोहिमेच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत आयुक्त राव यांनी घेतला. वारंवार खड्डे पडणाऱ्या ठिकाणांची आधीच पाहणी करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. त्यासाठी काही नाविन्यपूर्ण तोडगे काढता आले तर पहावे. जेणेकरून नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही. तसेच, रस्ता नादुरुस्त असल्याची तक्रार आल्यापासून २४ तासांच्या आत ती तक्रार मार्गी लागेल यासाठी गेल्यावर्षीप्रमाणेच सर्व यंत्रणांना समन्वय ठेवावा, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

Web Title: Keep the city ready before the monsoon provide green cover and irrigation facilities saurabh rao orders the municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
2

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त
4

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.