Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naresh Mhaske : ‘खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे उबाठाचेच नेते सूत्रधार, खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ‘खासदार फुटणार’ या बातम्या खोट्या असल्याचा दावा करत उबाठा नेत्यांवर टीका केली. पक्षातील अपयश आणि नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठीच या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 10, 2026 | 02:48 PM
‘खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे उबाठाचेच नेते सूत्रधार, खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका

‘खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे उबाठाचेच नेते सूत्रधार, खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे उबाठाचेच नेते सूत्रधार
  • उबाठाचे अपयश, पक्षांतर्गत नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी केविलवाणी धडपड
  • शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका
ठाणे : एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी उबाठाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर, अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचे वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावले.

खासदार म्हस्के यांनी सांगितले की, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरसंदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाठा खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.

Operation Tiger : “शिंदेगट डेडबॉडी.. देवेंद्र फडणवीसांकडून त्यांचं ऑपरेशन सुरु; खासदार संजय राऊतांचा चढला पारा

ते पुढे म्हणाले की, उबाठाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाठाने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत उबाठा मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत, असा दावा खासदार म्हस्के यांनी केला. पक्षातील नाराजी असल्याने लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या उबाठाचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत, असे खासदार म्हस्के म्हणाले. उबाठाचा खासदारांवर विश्वास नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

राऊतांच्या कटकारस्थानामुळेच उबाठा पक्ष मृतावस्थेत गेलाय, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे, असे ते म्हणाले. उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहेत, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरिक्षा द्यावी लागतेय, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय

Web Title: Naresh mhaske criticism ubatha fake news mp split claim news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • Shiv Sena
  • UBT

संबंधित बातम्या

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!
1

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.