Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसची नवी रणनिती, कल्याणमध्ये गरजूंसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा

विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. अशातच आता कल्याणमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी गरजू महिलांसाठी नवीन घोषणा केली आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 07, 2024 | 03:14 PM
काँग्रेसची नवी रणनिती, कल्याणमध्ये गरजूंसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा

काँग्रेसची नवी रणनिती, कल्याणमध्ये गरजूंसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा

Follow Us
Follow Us:

कल्याण:  विधानसभा निवडणूकीला काही दिवस राहिले आहेत. याचपार्श्वभूमीवर  महाविकास आघाडीमध्ये या जागांसाठी रस्तीखेच सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम आणि पूर्व ही जागा मिळण्यासाठी रणनिती आखली जात आहे. कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी स्वखर्चातून 10 हजार गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. विधानसभेच्या निवडणूकीसाठी राजाभाऊ काँग्रेसकडून इच्छूक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीकरीता जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल देण्यात येत आहेत का अशा चर्चा रंगत आहे.

हेही वाचा-  महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘बडी कॉप’ योजना राबवावी; युवक काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्षीय उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मात्र कोणती जागा कोणत्या पक्षाने लढवावी या बाबात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत हे सर्वात मोठं आव्हान आहे. कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा आहेत. या चारही विधानसभांपैकी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर काँग्रेस दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी कल्याण पश्चिम भागात नव्या सोयी व उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दहा हजार गरजू महिलांना स्वखर्चातून मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देणार असल्याची घोषणा केली आहे.कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जागांवर काँग्रेसने दावा ठोकला असून या दोन्ही जागा काँग्रेसला नाही मिळाल्या तर इच्छूक उमेदवार बंडखाेरी करणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून सचिन बासरे, काँग्रेस पक्षाकडून कांचन कुलकर्णी आणि पातकर हे इच्छूक असल्याची चर्चा आहे.  पूर्वेत काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे आणि शरद पाटील हे इच्छूक असल्याची चर्चा आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पाटकर काँग्रेस पदाधिकारी विमल ठक्कर काँग्रेस पदाधिकारी राजेश तिवारी उपस्थित होते.

 

Web Title: New strategy of congress announcement of free gas cylinder refill for the needy in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
1

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.