
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Ramesh Mhatre Doctor Assault : डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. तर कोर्टात हजर होताच आधारवाडी कारागृहात चौघाची रवानगी करण्यात आली आहे .06 जुलै 2026 रोजी डोंबिवलीच्या केडीएमसी संचालित शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या उपचारावरून वाद झाला होता. या वादातून डॉक्टर आणि नर्सला मारहाण करण्यात आली होती.
रमेश म्हात्रे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नगर सेवक आहेत, तसेच ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ते नगर सेवक आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी ते चर्चेत आले आहेत. त्यांचे शिक्षण 11 वी पर्यंत झाले आहे; असे सांगण्यात येते.
पोलिसांनी याप्रकरणी दोषींवर 1,832 पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. आत्मसमर्पण केल्या नंतर कल्याण कोर्टाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना आधारवाडी कारागृहात पाठवण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. “डॉक्टरांवर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत,” असे कोर्टाने सुनावले होते. रमेश म्हात्रे यांना ५ ऑक्टोबरपूर्वी शरण येण्याचा आदेश कोर्टाने दिला होता.
कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी चौघांना आता न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौघांची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. नगर सेवक रमेश म्हात्रे यांच्यावर आधी 19 गुन्ह्यांची नोंद आहे. ही दखल गंभीर स्वरुपाची असून उच्च न्यायालयाने आणि कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन अयोग्य ठरवण्यात आला; आणि रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
“वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांवर अशा प्रकारे हल्ले केले जाऊ शकत नाहीत. जर आरोपी जामिनावर बाहेर राहिला तर खटल्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयाने या जामीन रद्द करण्याच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या त्या कालमर्यादेच्या निर्देशावर कोणतीही नकारात्मक टिप्पणी केली नाही आणि खटला वेगाने चालवण्याला वाव दिला.