कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत आहे.
कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत पालिका अॅक्शनमोडवर काम करत आहे. विनापरवानगी बांधकामावर कारवाईसाठी पाहणी सुरु असताना पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.
या अभ्यासिकेत एमपीएससी युपीएससी, पोलीस भरती, इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने त्यांना हि फी भरणे कठीण होणार आहे.
वारंवार छोट्या मोठ्या आग लागण्याच्या घटना पाहता प्रशासनाने आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करीत यंत्रणा दक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेश उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्मित होतो. हे निर्मल्य जेव्हा मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये विसर्जित करतो तेव्हा त्या जलाशय विद्रूप होण्याची शक्यता वाढते.
कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टीएलआर कार्यालयात दाखल झाले. पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाब दाणाणले.
शाळांच्या परीक्षा महिना-दीड महिना वर येऊन ठेपले असताना शिक्षक सर्वेच्या कामात गुंतल्याने शाळेमधील नियोजनाचे बारा वाजले आहेत सोप्ग्य भाषेत सांगायचे झाले तर शाळेचे नियोजन बिघडले आहे.
शहरातील नागरीकांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक चालणे, धावणे व सायक्लिंग करणे याबाबत जनजागृती व त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा शहरात निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
आँनलाईन पद्धतीत यानिमित्ताने परवानग्या साठी टेबल टु टेबल पाठ पुरावा करावा लागत आहे. फाईलच्या या कारभारात गतीमानाता दिसून येत नसल्याने वास्तूविशारद, विकासक, फेऱ्या मारण्याची वेळ येत असल्याचे समजते.
कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली. या विरोधात फेरीवाल्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महापालिका आयुक्त जाखड या आंबिवली टिटवाळा परिसरात पाहणी दौरा करण्यासाठी निघाल्या असता त्यांच्या गाडीचा पाठलाग दुचाकीवरुन कोणीतरी करीत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले.
कल्याण पूर्वेत आयोजित कल्याण महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
कल्याण पश्चिमेकडे बेतुरकर पाडा परिसरात मनीषा नगर येथे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर आरोग्य केंद्राचे एक मजली इमारत उभारण्यात आली आहे. २००० साली ही इमारत उभारण्यात आली.