Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

मीरा-भाईंदरमध्ये रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावरून अॅक्टिवा स्कूटरने प्रवास करत असताना स्कूटरच्या आतील भागातून अचानक साप बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत वाहनचालकाने तत्काळ स्कूटर बाजूला घेतल्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेनंतर नागरिकांनी सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2026 | 04:13 PM
मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार!
  • धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप
  • चालकाची उडाली तारांबळ
विजय काते, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यचकित करणारा प्रकार समोर आला आहे. रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावरून अ‍ॅक्टिवा स्कूटरने प्रवास करत असताना स्कूटरच्या आतील भागातून अचानक एक साप बाहेर आल्याने वाहनचालकाची एकच तारांबळ उडाली.

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनचालक नेहमीप्रमाणे अ‍ॅक्टिवा स्कूटरने उड्डाणपुलावरून जात होता. त्यावेळी स्कूटरच्या आत काहीतरी हालचाल होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरुवातीला त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, पुन्हा हालचाल जाणवल्यानंतर त्याने जवळून पाहिले असता स्कूटरच्या आतील भागातून एक साप बाहेर येत असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहताच वाहनचालक घाबरून गेला. मात्र, प्रसंगावधान राखत त्याने तत्काळ स्कूटर रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभी केली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही. उड्डाणपुलावर ही घटना घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काही नागरिकांनी सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर तज्ज्ञांनी वाहनचालकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळ्यात उबदार आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप, पाल आणि इतर सरपटणारे प्राणी अनेकदा वाहनांमध्ये आश्रय घेतात. त्यामुळे दुचाकी सुरू करण्यापूर्वी सीटखालील भाग, इंजिनजवळील जागा आणि इतर लपण्यासारख्या भागांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे.

विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहन बराच वेळ उभे राहिल्यास त्यामध्ये साप किंवा इतर जीव आश्रयाला आलेले असू शकतात. त्यामुळे वाहन सुरू करण्यापूर्वी काही मिनिटे तपासणी करणे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तज्ज्ञांची मदत घेणे, हा अपघात टाळण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे.

अशावेळी काय कराल?

शांतता राखा: घाबरून अचानक ब्रेक लावल्यास किंवा वाहन रस्त्यावर सोडून दिल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे आधी स्वतःवर नियंत्रण ठेवा.
वाहन हळूहळू थांबवा: सुरक्षित जागी हळूच गाडी थांबवून गाडीच्या बाहेर पडा. सापाच्या हालचालींवर लक्ष ठेवा.
सापाला डिवचू नका: सापाला मारण्याचा किंवा स्वतःच्या हाताने पकडण्याचा प्रयत्न करू नका.
स्थानिक सर्पमित्राला संपर्क करा: ताबडतोब जवळच्या सर्पमित्राला किंवा प्राणी बचाव पथकाला (Animal Rescue Team) संपर्क करा.

सापांना वाहनांपासून दूर ठेवण्याचे उपाय

वाहनाची स्वच्छता: तुमची ऍक्टिवा किंवा कोणतेही वाहन नेहमी स्वच्छ ठेवा.
पार्किंगची जागा: वाहन शक्यतो बंदिस्त किंवा स्वच्छ जागी पार्क करा. उघड्यावर, गवतात किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ वाहन उभे करणे टाळा.
नियमित तपासणी: पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात साप थंडावा शोधत वाहनांच्या इंजिनमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉडीमध्ये लपतात. त्यामुळे गाडी सुरू करण्यापूर्वी पुढील भागात किंवा डिक्कीत लक्ष टाकून खात्री करा.

Mira Bhayandar News : महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; आदिवासी जमीन प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Web Title: Snake emerges from activa scooter on mira bhayandar flyover driver escapes major accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • scooter
  • Snake

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
1

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?
2

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती
3

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
4

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.