
१६,४९,८६९ इतकी मतदारसंख्या, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिका सज्ज(फोटो सौजन्य-Gemini)
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये १६,४९,८६९ इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये ८,६३.८७८ पुरुष व ७.८५.८३० महिला आणि १५९ इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी १ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वित्तरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरीता ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगासाठी कौलवेअर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविचा उपलब्ध असणार आहेत.
निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्रॉग रूम, ईव्हीएम व कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीची ठिकाणे, मुख्य स्ट्रॉग रुम, चेक पोस्ट आदीवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरीता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण ६४८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेच्या एकूण ११ विभागांमध्ये ४५ ठिकाणी एकूण ३०५ संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण ७०१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असून प्रत्येक टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आलीआहे. १३ जानेवारी रोजी प्रचार संपला असून त्यानंतर सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही व्यक्तीस उमेदवारास, राजकीय पक्षास प्रचार करता येणार नाही, याची नोंद घ्यावयाची असून आचार संहिता पथकाने याबाबत अधिक दक्ष रहावे अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरभराव यांनी दिल्या आहेत व नागरिकांनाही याचाचत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.