राज्यामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षानंतर पालिकेच्या निवडणूका होत असल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
voting process for four-member voting in EVM machines for municipal elections 2026

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 29 पालिकांसाठी उद्या (दि.15) मतदान केले जाणार आहे. तसेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. तसेच नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे चार मते द्यायची आहेत. त्यामुळे मतदानापूर्वी ही चार मते कशी द्यायची हे जाणून घेऊया

अनेक वर्षानंतर महापालिका निवडणूका होत असल्यामुळे राजकीय वातावरण रंगले आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करावे असे आवाहन केले जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यानुसार एका मतदारसंघामध्ये अ, ब, क, ड असे चार गट असणार आहेत. प्रत्येक मतदाराला चार मते द्यावीच लागणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक व्यक्तीला चार मते द्यायची आहे.

प्रत्येक जागेसाठी (अ, ब, क, ड) उमेदवारासमोरील बटण दबावे लागणार आहे. प्रत्येक गटासाठी ईव्हीएम मशीनवर चार वेगवेगळे रंग असणार आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अ जागेसाठी पांढरा रंग (White), ब जागेसाठी फिकट गुलाबी रंग (Light Pink), क जागेसाठी फिकट पिवळा रंग (Light Yellow) आणि ड जागेसाठी फिकट निळा रंग (Light Blue) देण्यात आला आहे.

प्रत्येक गटासाठी मतदान केल्यानंतर एक लहान लहान आवाज आला जाणार आहे. एक मत देण्यासाठी बटण दाबल्यानंतर त्या जागेसाठी लाल दिवा (Light) लागेल. पूर्ण चार जागांचे मतदान झाल्यानंतर म्हणजेच ‘ड’ जागेचे मतदान झाल्यानंतर लांब ‘बजर’ वाजेल. हा पूर्ण मोठा बजर वाजल्यावर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजववे जाईल,.

प्रत्येकाने चार जणांना मतदान करणे बंधनकारक आहे. एक किंवा दोन जणांना मतदान केल्यास आणि मोठा बजर वाजेपर्यंत न थांबल्यास मत अवैध धरले जाईल. त्यामुळे चारही मते देणे बंधनकारक आहे.

कोणत्याही गटातील एकाही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर नोटावर मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे चार सदस्यीय विभाग असल्याचा चार मते देणे गरजेचे असणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार मते देणे महत्त्वाचे आहे.






