राज्यात सत्ताविरोधी भावना असली तरी ती संपूर्ण बंगालमध्ये एकसारखी नाही. बेरोजगारी, आर्थिक अडचणी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत नाराजी असली तरी हा असंतोष वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सामाजिक गटांनुसार बदलतो.
या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांना मारहाण करत अनेक वाहनांचे नुकसान केले. रॅलीतील काही मोटारसायकलींना रस्त्यावरच पेटवून देण्यात आले.
Thane Election 2026: ठाण्यात निवडणुकीदरम्यान महापालिकेचा आदेश डावलल्याचे समोर आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे ईव्हीएम मशीनवर पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आता राजकारणात चर्चा रंगली आहे.
ठाण्यातील निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ठाण्यातील टिटवाळा येथे प्रभाग क्रमांक 3 मधील EVM मशीनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शेखर वाकोडे यांचे चुकीचे नाव छापल्याने मतदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून १ ते २८ व ३० ते ३३ प्रभागांमध्ये अ,ब, क, ड अशा ४ जार्गाकरीता व प्रभाग क्र. २९…