Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणे आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांत तात्काळ सोयीसुविधा पुरवा ; नरेश म्हस्के यांची रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक

ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची आज बुधवार, 23 एप्रिल रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 23, 2025 | 05:18 PM
Thane News : ठाणे आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांत तात्काळ सोयीसुविधा पुरवा ; नरेश म्हस्के यांची रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे :  ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांची मध्य रेल्वे व्यवस्थापक  विभागाशी बैठक पार पडली आहे.  मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानके आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे महाव्यवस्थापकांनी समस्यांवर तोडगा काढण्याचे तसेच लवकरच स्थानकांचा पाहणी दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले. या बैठकीला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, मा. नगरसेवक रमाकांत म्हात्रे, शिवराम पाटील,  नगरसेवक विजयानंद माने, शहर संघटक नंदा काटे, बाळा गवस, जयेश जाधव, अजित दुबे (रेल्वे कमिटी सदस्य) आदी उपस्थित होते.

ठाणे रेल्वे स्थानकातील समस्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. वर्तकनगर येथील आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी निर्देश दिले. नवी मुंबई शहारातील रेल्वे स्थानकांतील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये दिघा, भोलानगर, अनंत नगर रेल्वे खालून गणपती पाडा येथे राहणाऱ्या रहिवाश्यांकरिता जाण्या-येण्याकरिता रस्ता बनवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दिघा येथे असलेले पाण्याचे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हे धरण हस्तांतरीत झाल्यास दिघा येथील पाणी समस्या दूर होण्यास मदत होईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले.

सर्व रेल्वे स्थानकांमधील शेड पत्रे, पंखे, लाईट, ध्वनिक्षेपक दुरूस्ती करणे तसेच बाहेरील पेव्हर ब्लॉक दुरूस्त करणे, स्थानका बाहेरचा परिसर स्वच्छ करणे,  रेल्वे स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुलर बसविण्यांत यावे,  दिघा ते तुर्भे स्थानकाबाहेर बुट पॉलीश धारकांना जागा देणे, काही स्थानकांमध्ये उंचीच्या अनुषंगातून सरकते जिने बसविणे या मागण्या केल्या आहेत.

ऐरोली स्थानकामध्ये आरक्षण खिडकी सुरू करणे, बहुमजली पार्किंग, कोपरखैरणे स्थानकाबाहेरील पार्किंग सुस्थितीत करणे, रात्रीची गस्त वाढविणे,  रबाले स्थानक पश्चिमेकडील तिकीट खिडकी रात्री 11 वाजेपर्यंत चालू ठेवणे, सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे थांबलेले  काम लवकर सुरू करणे अशा अनेक प्रलंबित समस्यांसंदर्भात डीआरएम हरेश मिना यांचीशी  चर्चा करून या समस्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्यानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. लवकरच नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांचा पाहणी दौरा डीआरएम यांच्यासमवेत आयोजित करण्यात येणार आहे. सिडको कडील रेल्वे स्टेशनच्या समस्या, नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन हस्तांतरित करण्यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Thane news provide immediate facilities at railway stations in thane and navi mumbai naresh mhaske holds meeting with railway officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • Navi Mumbai News
  • thane

संबंधित बातम्या

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
1

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
4

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.