Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

HSC and SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी पासून आणि दहावीची परिक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू ..

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2026 | 02:40 PM
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

Follow Us
Follow Us:
  • आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
  • १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार
  • परीक्षा केंद्रांवर प्रचंड गर्दी
HSC and SSC Exam News in Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून (10 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १० हजार ६६४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल १५ लाख ३२ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून सीसीटीव्ही यंत्रणेसह विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावेत, तसेच परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे, तसेच काही अडचण असल्यास तत्काळ केंद्रप्रमुख किंवा परीक्षा निरीक्षकांशी संपर्क साधावा, अशी माहिती परीक्षा निरीक्षक सीमा सिद्दिकी (सभु विद्यालय आर्ट अँड कॉमर्स कॉलेज) यांनी दिली.

एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये करियर कसे करावे? ‘या’ प्रक्रिया फॉलो करून मिळवता येईल ट्रॅव्हल मॅनेजमेंट कोर्स

परीक्षा केंद्रांवर प्रचंड गर्दी

कोणत्याही गोंधळाशिवाय या परीक्षा पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. एकीकडे शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार न करता परीक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर या अभियानाच्या अंमलबजावणीत पोलिसांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासाठी त्यांनी नेमकी काय खबरदारी घेतली आहे. यासंदर्भात ज्युनियर कॉलेजच्या vice-principal डॉ. अंजली पुरंदरे यांनी नवराष्ट्राशी संवाद साधतांना सांगितले. दरम्यान, शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात गर्दी करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच नियमाचा भंग केल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

भरारी पथक तैनात…

ठाणे जिल्ह्यात बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा शिक्षण विभागा मार्फत सहा भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत. तर, जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली देखील तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. यंदा जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेसाठी, अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज हे संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत किंवा केंद्रावर रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, सतत शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, विशेषज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी देविदास महाजन यांनी महिला विशेष पथकाच्या समावेशाबाबत माहिती दिली.

कुंफू शिकला आहात? मग आता पुढे काय करायचं? करिअर करायचंय तर एकदा वाचा

Web Title: Ssc hsc board exam 2026 student count exam centers details news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Exam
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.