Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; 4 जून रोजी शहरातील 'या' भागात पाणीकपात
पावसाळा सुरु होण्याआधी शहरातील पाण्याच्या साठ्यांचं निर्जंतूकिरण करणं महत्त्वाचं आहे हीच बाब लक्षात घेत पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी पालिकेने कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, करण्यासाठी बुधवारी शहरात पाणी कपात होणार असल्याचं सांगितलं आहे. टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार 04 जून रोजी करण्यात येणार आहेत. त्य़ामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणारअसल्याचं पालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
जल शुद्धीकरण तसंचं काही तांत्रिक कामांकरिता बुधवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असून गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस पाणी दबाने येईल असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पुढील तीन दिवस पाणी जपून वापरा असं आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी 9 ते रात्री .9 या काळात म्हणजेच एकूण 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे 12 तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे. पुढील तीन दिवस पाणी जपून वापरा असं आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.