Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : राज्यात ठाणे जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर ; कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत अव्वल स्थान

महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन - 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा’ अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2025 | 06:08 PM
Thane News : राज्यात ठाणे जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर ; कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत अव्वल स्थान

Thane News : राज्यात ठाणे जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर ; कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत अव्वल स्थान

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन – 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा’ अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवुन आणली आहे.

यामध्ये विशेष प्रयत्नशिल राहणारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने ९२.०० गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले.

या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाणेच्या प्रत्येक अधिकाकारी आणि कर्मचाऱ्याचं आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी याचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील, असंं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलं आहे.

या उल्लेखनीय यशामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रशासनाच्या कार्यक्षमतेस मान्यता लाभली आहे. ही उपलब्धी जिल्हा परिषद ठाणेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे व निष्ठेचे फलित आहे.शासनाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी समर्पित असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अभिनंदन करण्यात येत आहे. हा सन्मान भविष्यातील जिल्हा परिषदेच्या कामकाजात अधिक गुणवत्ता व पारदर्शकता साधण्यासाठी प्रेरणादायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेचे १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत नाविन्यपुर्ण कामकाज
‘Door Step Delivery’ सर्व शासकीय कागदपत्र नागरिकांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी ‘Door Step Delivery’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर उपक्रम ४३१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित करण्यात आला असून २० दिवसात ३ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घर बसल्या शासकीय कागदपत्र घेण्याचा लाभ देण्यात आला आहे.

दिशा उपक्रम
ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात जास्त असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी दिशा उपक्रमातून 31 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्या एआयच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. 10 महिन्याच्या कालखंडात भाषा आणि गणित या विषयात अध्ययन स्तर दुप्पटीपेक्षा जास्त वाढविण्यात यश आले आहे. सदर उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासन स्तरावर घेत निपूण महाराष्ट्र या उपक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे.

ई ऑफिस
जिल्हा परिषद अंतर्गत ई ऑफिस मार्फत सर्व फाईल व टपाल डिजिटल फाईल मोमेंट करण्यात येत असून चार स्तरांपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे तसेच प्रत्येक नस्ती सात दिवसांमध्ये निपटारा करण्याचे प्रयत्न असून कागद विरहित कामकाज करण्यात जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे.

स्कीम एप्लीकेशन पोर्टल
जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती, उद्देश, अर्ज भरण्याच्या पद्धती याची सविस्तर माहिती या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच यावेळी पोर्टलचा वापर करून लाभार्थी डिजिटल पद्धतीने अर्ज देखील करू शकतात.

Block Facilitation Committee
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा स्तरावरावरील अधिकारी पंचायत समिती स्तरावर जावून तालुका सुविधा समिती योजना “Block Facilitation Committee” अंतर्गत ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.

ई कामवाटप
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन विकास कामाचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. यामार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे.

ई. एच. आर. एम. एस
ई. एच. आर. एम. एस. वेबसाईट मार्फत जिल्हा परिषदेच्या 500 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजिटल पद्धतीने संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सेवाविषयक सर्व बाबी व लाभ वेळेत देण्यासाठी या वेबसाईटचा वापर करण्यात येणार आहे.

कामकाजात AI चा वापर
चॅट जी पी टी मार्फत शासकीय कामकाजाच्या टिपणी, पत्र, नोंद, संशोधन याबाबत मार्गदर्शन घेऊन काम जलद गतीने करण्यात येत आहे.‌ तसेच नोटबुक एल. एम. याचे वापर करून शासकीय पुस्तक, जीआर किंवा माहिती असलेले कागदपत्र अपलोड केल्यास त्याबाबतचे संक्षिप्त किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जलद गतीने करण्यात येत आहे. कॅनव्हाचा वापर करून शासकीय कामकाजाचे पावरपॉइंट प्रेझेंटेशन, मायका ॲप चे वापर करून मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी चॅटबोट चा वापर करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच आपली मानसिक स्थिती याबद्दलची माहिती मिळते तसेच उपचार घेण्यासाठी देखील त्याचा फायदा होतो. गामा अँप चे वापर करून काही मिनिटांत शासकीय कामकाजाचे सादरीकरण करता येते.

AI चा वापर करून शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी उपयोग होत आहे तर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना तुलनात्मक तक्ता कामकाजाचा excel, पावरपॉइंट उपयुक्त असून‌ सर्व ॲपचा वापर करून शासकीय कामकाजात कशाप्रकारे गतिमानता येऊ शकते याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद सुशोभीकरण
स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष, नागरिकांना जिल्हा परिषदेची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत केऑस निर्मिती, जिल्हा परिषदेच्या विविध योजनेची व विभागनिहाय कामकाजाचे व ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणांना जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे.

Web Title: Thane news thane zilla parishad ranks first in the state top position in office evaluation campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • thane
  • Thane News update

संबंधित बातम्या

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा
1

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा

आस्तादने मानले राजकीय नेत्यांचे आभार! घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकला कंटाळून केली पोस्ट
2

आस्तादने मानले राजकीय नेत्यांचे आभार! घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकला कंटाळून केली पोस्ट

Thane News : अनधिकृत बांधकामावर विशेष पथकाची करडी नजर; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश
3

Thane News : अनधिकृत बांधकामावर विशेष पथकाची करडी नजर; महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश

Thane : रिपाइं एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड
4

Thane : रिपाइं एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.