ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात व जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच यावर्षी मान्सून लवकर दाखल झाल्याने पहिल्याच पावसात तात्पुरत्या स्वरूपाची पुरपरिस्थिती निदर्शनास आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, विस्तृत उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत.
प्रमुख उपाययोजना:
१. आपत्ती व्यवस्थापन कक्षांचा समन्वय
जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुरस्थितीवर दैनंदिन नियंत्रण ठेवत आहे.
पंचायत स्तरावरील तालुकास्तरीय कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्ष, वागळे सर्कल रोड नंबर 22, जिल्हा परिषद ठाणे येथील साथरोग नियंत्रण कक्षाशी नियमित संपर्कात राहण्याचे निर्देश
२. आरोग्य पथकांची तैनात
मोठ्या लोकसंख्येच्या गावात 2 महिला व 2 पुरुष कर्मचारी,
तर लहान गावात 1 महिला व 1 पुरुष कर्मचारी 24×7 सेवा देणार.
या पथकांकडे औषधसाठा व तातडीच्या तपासणीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध.
३. पुरेसा औषध साठा व शुद्धीकरण साहित्य
TCL पावडर, मेडीक्लोर, इत्यादी पाणी शुद्धीकरण साहित्य ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना. साथीचे आजार उदभवू नये म्हणून आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना.
४. दैनंदिन रुग्ण सर्वेक्षण
घराघरांत आशा व आरोग्य कर्मचारी भेट देऊन ताप, जुलाब, सर्दी, अतिसार यांचे सर्वेक्षण करून आढळलेल्या रुग्णांवर तातडीचे उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार. गंभीर रुग्णांना संदर्भित संस्थेकडे पाठविण्याची व्यवस्था.
५. किटकजन्य आजार नियंत्रण
तापाचे रुग्ण आढळणाऱ्या भागात रक्तनमुने गोळा करून तपासणी.
चिकनगुनिया/डेंग्यू संशयित ठिकाणी रक्तनमुने प्रयोगशाळेत पाठवणार.
20% घरांतील पाणी साठ्याची तपासणी करून अळ्यांचे प्रमाण निश्चित करणार.
डासोत्पत्ती स्थळी अळीनाशक फवारणी.
६. विस्थापितांसाठी आरोग्य सेवा
पाण्यामुळे घर सोडलेल्या नागरिकांसाठी शाळा/ देवालये /मंगल कार्यालयांमध्ये
वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी व औषधोपचार.
७. आरोग्य शिक्षण व जनजागृती
मायकिंग, भित्तीपत्रके व इतर माध्यमांतून स्वच्छतेबाबत आणि टाळावयाच्या गोष्टींबाबत माहितीप्रसार.
८. पाणी गुणवत्ता नियंत्रण
जलसुरक्षकामार्फत पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया.
पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे.
आरोग्य सेवक आणि सहाय्यकांकडून प्रतिदिन निरीक्षण.
९. ब्लीचिंग पावडर गुणवत्ता नियंत्रण
गुणवत्तेची तपासणी झालेली पावडरच वापरण्याचे आदेश.
साठा ग्रामपंचायत मुख्यालयी ठेवण्याची सूचना.
१०. पाणी पुरवठा गळती दुरुस्ती
नळ किंवा व्हाल्वमधील गळती तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश.
11. गरोदर मातांची विशेष काळजी
संभाव्य प्रसूती तारीख लक्षात घेऊन उच्च जोखमीच्या गरोदर महिलांची यादी.
गरजेनुसार त्यांना आरोग्य संस्थांमध्ये हलवले जाणार.
12. सर्पदंश आणि विंचूदंश उपचार व्यवस्था
संबंधित औषधांचा पुरेसा साठा सर्व प्राथमिक केंद्रांवर उपलब्ध.
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक.
13. लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंध
पुराच्या पाण्यात काम करणाऱ्यांसाठी डॉक्सिसायक्लिन औषधाचा प्रतिबंधात्मक वापर मार्गदर्शक सूचनांनुसार.
14. आंतरविभागीय समन्वय
जलसंपदा, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, नगरविकास विभाग यांच्यात तालुका स्तरावर समन्वय साधून कारवाई.
ही सर्व उपाययोजना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धपणे राबविण्यात येत असून, पुरपरिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.