Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये कोण मारणार बाजी? ठाकरे शिंदे गटात होणार काटे की टक्कर

अंबरनाथ मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अर्ज भरला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 29, 2024 | 08:05 PM
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये कोण मारणार बाजी? ठाकरे शिंदे गटात होणार काटे की टक्कर
Follow Us
Close
Follow Us:

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार डॉ.बालाजी किणीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सलग तीन वेळा शिवसेनेतून निवडून आलेले आमदार किणीकर हे यंदा चौथ्यांदा शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवत आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती करिता राखीव असून महायुतीचे उमेदवार म्हणून किणीकरांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान आमदार किणीकर यांनी महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. अंबरनाथ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कल्याण जिल्हा प्रमुख गोपळ लांडगे, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर उपस्थित होते.

अंबरनाथ मतदारसंघात चुरशीची लढत

अंबरनाथ मतदारसंघामध्ये गेल्या निवडणूकीत डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखडे हे उमेदवार आहेत. राजेश वानखडे यांनी 2014 साली आमदार बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अवघ्या 3 हजारा मतांनी वानखडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर वानखडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने त्यांना या विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने अंबरनाथमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

हे देखील वाचा- भाजपच्या मुंबईतील गडाला हादरा ! बोरीवलीतून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सादर केला अपक्ष उमेदवारी अर्ज

शिवसेनेचा बालेकिल्ला

1978 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिल्या निवडणूकीत जनता पार्टीचे उमेदवार येथून निवडून आले त्यानंतरच्या काळात  काळात या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 90 च्या दशकात शिवसेनेच्या झंझावातात हा मतदारसंघ ही शिवसेनेने जिंकला. शिवसेनेचे माजी मंत्री साबीर शेख यांनी 1990, 1995, 1999 असा सलग तीन वेळा अंबरनाथमधून विजय मिळवला होता. त्यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसन कथारे यांनी साबीर शेख यांचा काही हजारांच्या मतांनी पराभव केला आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला.

हे देखील वाचा- Baramati Assembly Constituency : पवारांच्या लढाईत अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीतून लढणार निवडणूक

अंबरनाथकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला

2009 च्या निवडणूकीमध्ये बालाजी किणीकर यांनी विजय मिळवत शिवसेनेकडे हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणला.  सलग तीन निवडणूकांमध्ये त्यांनी विजय झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. मात्र 2022 मध्ये  झालेल्या शिवसेना फुटीमुळे या मतदारसंघात नेमक्या कोणत्या शिवसेनेला अंबरनाथकर कौल देणार  हे या निवडणूकीत ठरणार आहे. लोकसभा निवडणूकीमध्येही या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना चांगली मते मिळाली होती. विशेष म्हणजे अंबरनाथ मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचेही या मतदारसंघात विशेष लक्ष आहे.

 

Web Title: Who will win in shiv senas stronghold ambernath there will be a thorn in the side of the thackeray shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:05 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • shivsena

संबंधित बातम्या

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
1

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
2

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
3

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
4

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.