Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंच्या फक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 04:09 PM
उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, सर्व निर्णय...; भाजपच्या नेत्याची टीका

उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, सर्व निर्णय...; भाजपच्या नेत्याची टीका

Follow Us
Follow Us:
  • ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही
  • उबाठातील सर्व निर्णय राऊतांच्या मर्जीनुसारच
  • भाजपच्या नेत्याची टीका
मुंबई : राज्यसभेच्या जागेसाठी संख्याबळानुसार उबाठा गटाचे पारडे जड असताना समीकरणे फिरवत मविआकडून संजय राऊतांच्या मर्जीतील शरद पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. स्वत:ची राज्यसभा सुरक्षित करण्यासाठी राऊतांनी धूर्त डाव टाकला. या निर्णयावरून उबाठा गटाच्या निर्णय प्रक्रीयेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत उरली नसून, सर्व निर्णय हे संजय राऊतांच्या मर्जीनुसारच घेतले जातात हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न राऊतांनी केला असल्याची प्रखर टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे.

 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कट कारस्थान करत उबाठा गटाचे आपणच प्रति पक्षप्रमुख असल्याचे सिद्ध करत राऊतांनी एका दगडात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रियांका चतुर्वेदी या तीन पक्षांना घायाळ केले आहे, असा घणाघातही बन यांनी केला.

यावेळी बन म्हणाले की, महिनाभरापूर्वीच राऊतांनी मविआकडून शरद पवार यांचे नाव जाहीर केले होते आणि राऊतांचा तोच निर्णय काँग्रेस आणि उबाठा गटावर लादला गेला. शरद पवारांप्रति असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर प्रियांका चतुर्वेदी यांचे उबाठा गटामधील वाढणारे अस्तित्व कमी करून त्यांचे पंख छाटण्यासाठी राऊतांनी शरद पवारांचे नाव पुढे केले होते. सर्वात कमी संख्याबळ असतानाही शरद पवारांना उमेदवारी घोषित झाली यावरूनच मविआमध्ये काँग्रेसची अवस्था तर वापरून फेकून द्यावे तशी कढीपत्त्यासारखी झाली आहे. उद्धव ठाकरे तर विधानपरिषदेकडे डोळे लावून बसल्याने त्यांच्यासमोर या निर्णयाला मम म्हणण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचाही टोला त्यांनी लगावला.

दोन राष्ट्रवादींचे विलिनीकरण करायचे की नाही हा निर्णय घेण्यास आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्राताई पवार सक्षम आहेत. सुनेत्राताईंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय उत्तमरित्या प्रगती करेल असा विश्वास व्यक्त करत बन म्हणाले की, सुनेत्राताईंना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची गरज उरलेली नाही. मविआकडून शरद पवारांचे नाव घोषित करण्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न करण्याची अटच घातली होती. मात्र शरद पवारांचा स्वभाव आणि कमकुवत झालेल्या राष्ट्रवादीला ही अट कितपत पेलेल ही शंकाच आहे असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

हे सुद्धा वाचा : फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं

Web Title: Bjp leader criticizes uddhav thackerays shiv sena in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • BJP
  • NCP Sharad Pawar
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
1

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
2

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
4

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.