Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 05, 2026 | 05:36 PM
Maharashtra Education Reform

Maharashtra Education Reform

Follow Us
Follow Us:

मुंबई : राजकारण करण्यासाठी बाप मोठा असावा लागतो, नाव मोठं लागतं, आडनाव मोठं लागतं, मी मोठ्या बापाची मुलगी नाही पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक धडपड आणि काम यापुढे तुम्ही गरिब जरी असलात तरी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष असते आणि ते न्याय देतात याचं उदाहरण आज समोर आहे, अशी भावना शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली राज्यसभेची उमेदवारी ही राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे, अशी भावना डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज माझ्यासारख्या गरिब कुटुंबातील मुलीला, डॉ. भीमरावांच्या मुलीला दिलेला हा न्याय आहे. त्या म्हणाल्या की, माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची आणि संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे, असे सांगत त्यांनी महापुरुषांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या आई वडिलांना राज्यसभा काय हे माहित नाही आणि त्यांना सांगून देखील खरं वाटणार नाही. जातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले. उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना राजकारणात समान हक्क, निर्णयप्रक्रियेत सहभाग आणि नेतृत्वाची संधी मिळावी, अशी जी दूरदृष्टी मांडली होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व सामाजिक समतेसाठी उभारलेला लढा आज अशा सुशिक्षित आणि जिद्दी प्रतिनिधित्वातून पुढे जाताना दिसतो. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. वाघमारे यांना दिलेली उमेदवारी हे सशक्त प्रतिबिंब आहे.

शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम – एकनाथ शिंदे

शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना राबवली. अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला. शिवसेनेत मागील साडेतीन वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करतोय, त्याचा एक भाग म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिलेली आहे. डॉ. वाघमारे या शिवसेनेची भूमिका, ध्येयधोरणं आणि पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहोचवली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न त्या राज्यसभेत उपस्थित करतील. त्यांनी पक्षाकडे कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नव्हती. शिवसेनेची निवड सार्थक ठरेल, असा विश्वास शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

Web Title: Eknath shinde on the work of empowering the ordinary worker from the party side

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • shivsena

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
3

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.