Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर

केंद्रीय आरोग्य विभागाने स्त्री-पुरुष जन्मदरासंबंधी मागील काही वर्षेत एक अहवाल जाहीर केला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माची तुलना त्यात केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत चिंताजनक अशी आह

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 24, 2024 | 12:16 PM
मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर

मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर/ दीपक घाटगे : केंद्र, राज्य सरकारान महिलांच्या उन्नतीकरता अनेक कायदे तयार केले, विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना, विविध क्षेत्रांत महिला प्रगती करीत आहेत. परंतु एवढय़ावरून समाजात स्त्री-पुरुष समानता आली किंवा कुटुंब व्यवस्थेत पुरुष ज्या पद्धतीने स्वांतत्र्य उपभोगतो, तेवढे त्याच कुटुंबातील स्त्रीला उपभोगता येते का ? हा प्रश्न अजूनही सर्व समाजात आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने स्त्री-पुरुष जन्मदरासंबंधी मागील काही वर्षेत एक अहवाल जाहीर केला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माची तुलना त्यात केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत चिंताजनक अशी आहे. मुलींचा जन्मदर १ हजार मुलांमागे अवघा ८६२ एवढा आहे. गेल्या पंधरा-सोळा वर्षांत मुलींच्या जन्मदराने इतका नीचांक कधीच गाठला नव्हता. २०११ च्या जनगणना अहवालात जिल्ह्यातील स्त्री-पुरुष जन्मदराची आकडेवारी पाहता ही संख्या १३८ ने कमी झाली आहे. मुलींचा घसरता जन्मदर सामाजिक चिंता वाढविणारा तर आहेच पण सध्या मुलाना लग्नासाठी मुली मिळेनात ही विदारक परिस्थिती आज समाजात निर्माण झाली आहे. यासाठी प्रबोधनाची चळवळ गतीमान होणे गरजेचे आहे. राज्य सरकार मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ या केंद्र सरकारच्या योजनेची जाहिरातबाजी करून मोठाच गाजावाजा केला जात असल्याचे आपण पाहत आहोत.

कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे. जिथे शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी मुलींचा जन्मदर का घटला आहे. हा संशोधनाचा विषय आहे. सामाजिक-आर्थिक स्तरावर आघाडीवर असलेल्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढणे अपेक्षित होते. पण तो घटला असल्याने निवळ कायदे करून स्त्री-पुरुष समानता येणार नाही, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. हे पण तितकेच खरे आहे.

कायदे कुचकामी ठरले का?

महाराष्ट्रात आणि देशातही स्त्रीभ्रूण हत्येचे अनेक प्रकार उघडकीस येऊ लागल्याने केंद्र सरकारने गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा अधिक कडक केला. परंतु कोल्हापूरातील या घटनेमुळे याची अमंलबजावणी नीट होताना दिसत नाही. मुलीच्या जन्माला कमी लेखणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रचार-प्रसाराला बंदी घालण्यात आली. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या जन्माचा सन्मान करणे, तिचे पालनपोषण, शिक्षण यांसाठी या योजना किंवा कायदे अगदीच कुचकामी ठरले आहेत? का असा प्रश्न आहे.

मानसिकता बदलणार का?

समाजात स्त्रियांना दुय्यम लेखण्याची मानसिकता तयार होते कशी, त्याची संसाधने काय आहेत, या भावनेच्या भोवऱ्यातून बाहेर येऊन विचार करण्याची गरज समाजावर येऊन ठेपली आहे. जुनाट मानसिकतेतून जोपर्यंत समाज बाहेर पडत नाही, तोपर्यंत भरभराटीच्या शहरांतही मुलींच्या जन्माची चिंता वाढविणारे अहवाल दर वर्षी जाहीर होत राहणार आहेत. मुलींच्या जन्मदरासंबंधीच्या अहवालाने समाजापुढेही मोठे आव्हान उभे केले आहे.

१००० मुलांमागे ८६२ मुली

कोल्हापूर जिल्ह्य़ातील बाल लिंग गुणोत्तराचा डेटा विचारात घेतल्यास हा आकडा १००० मुलांमागे ८६२ मुली आहेत. एक हजार मुलांमागे सर्वांत कमी मुली जन्माला येण्याचे प्रमाण पन्हाळा तालुक्यात अधिक असून त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात ८९३ मुलींचा जन्म झाला आहे. तर १ हजार मुलांमागे १००२ मुलींचा जन्मदर ठेवत चंदगड तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. हा आकडा भूषणावह आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मूलींचा जन्मदर

वर्ष         जन्मदर
२०१३      ८१७
२०१५      ९२४
२०१८     ९३३
२०१९     ९२५
२०२०    ८३२
२०२१    ८८३
२०२२   ९१०
२०२३   ८८७

Web Title: The central report has concluded that the birth rate of girls has decreased in kolhapur district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • kolhapur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?
2

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी
3

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
4

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.