Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यांवरील खड्डे ,अस्वच्छता प्रश्नी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

गणेशोत्सव दोन दिवसावर आला असताना रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. प्रशासनाकडून अतिशय संथपणे कामे सुरू असल्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

  • By नारायण परब
Updated On: Sep 02, 2024 | 06:12 PM
रस्त्यांवरील खड्डे ,अस्वच्छता प्रश्नी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :-  गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रमुख संस्था असलेल्या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर केडीएमसीकडून अतिशय संथपणे कामे सुरू असल्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा- महाराष्ट्रात महिला आणि मुली गायब होण्यामागचे भितीदायक गूढ…!

शहरात रस्त्यांवर खड्डे आणि अस्वच्छता

गणेशोत्सव तोंडावर आला असला तरी अद्याप शहरात जागोजागी प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, हेही कमी म्हणून की काय त्याचजोडीला काही ठिकाणी अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. मात्र त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अतिशय संथगतीने कार्यवाही सुरू असल्याचे महामंडळातर्फे आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सार्वजनिक किंवा घरगुती गणपती आणणे अडचणीचे ठरणार असल्याचा महत्त्वाचा मुद्दाही सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीत मांडण्यात आला.

हे देखील वाचा- ऐन गणेशोत्सवात राज्यभरात एसटी बंद राहणार? उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन, काय आहेत मागण्या?

कामे 1-2 दिवसात पुर्ण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

केडीएमसी आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीमध्ये शहरातील स्वच्छता, पथदिवे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्या, विसर्जन घाटावरील अपूर्ण तयारी आदी प्रमूख विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली आहे. तर ही सर्व कामे येत्या 1-2 दिवसांत आम्ही पूर्ण करू असे आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह महामंडळाचे विजय कडव, राकेश मुथा, प्रतीक पेणकर, सुधीर वायले, महेश बनकर, सागर भालेकर, कुणाल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काल (दि. 1 सप्टेंबर)  कल्याण पश्चिमेचे  आमदार विश्वनाथ भोईर यांनी  खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन स्पेशल अपयशी ठरले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट प्रशासनाला इशारा दिला आहे.  तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Web Title: The delegation of public ganeshotsav corporation met the kdmc commissioner regarding potholes and unsanitary issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • Ganeshotsav
  • kalyan news

संबंधित बातम्या

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
1

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
2

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
3

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

आता बाप्पाला सुद्धा मुंबईची सफर घडणार! पहिल्यांदाच डबल डेकर बसवर गणरायाची भव्य मिरवणूक निघणार
4

आता बाप्पाला सुद्धा मुंबईची सफर घडणार! पहिल्यांदाच डबल डेकर बसवर गणरायाची भव्य मिरवणूक निघणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.