Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुन्हा घटना घडल्यास हिंदू समाज शांत बसणार नाही!…’ झाराप प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक

झाराप येथे पर्यटकाला चहाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीविरोधात कुडाळात सकल हिंदू समाजाने पोलिसांना निवेदन दिले. पर्यटनाला बाधा पोहोचू नये यासाठी संबंधित स्टॉल बंद करण्याची मागणी करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 07, 2025 | 08:49 PM
‘पुन्हा घटना घडल्यास हिंदू समाज शांत बसणार नाही!…’ झाराप प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. अशा शुल्लक कारणावरून जर मारहाण होत असेल, तर ती या पर्यटन जिल्ह्याची बदनामी आहे. तसेच सदर इसमाचा स्टॉल बंद करण्यात यावा. यापुढे अशाप्रकारची घटना घडल्यास हिंदू समाज शांत बसणार नाही असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन शुक्रवारी सायंकाळी देण्यात आला. झाराप येथे पर्यटकाला चहा बदलून देण्याच्या विषयावरून माराहाण झाली होती. या घटनेनंतर पोलीसांनी संबंधितांची तक्रार नसताना स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत सहा जणांवर गुन्हे दाखल केले होते. या घटनेचे पडसाद कुडाळात शुक्रवारी उमटले.

बिल्डिंग अनधिकृत असल्याचे सांगून खंडणी मागण्याचा प्रकार; चौघांवर गुन्हा दाखल

यानंतर सायंकाळी सकल हिंदू समाज एकवटत कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. यावेळी आपल्या मागणीचे निवेदनही पोलीस प्रशासनाला दिले. यावेळी चर्चा करताना सांगितले की, शुल्लक कारणावरून पुणे येथील पर्यटकांना झाराप झिरो पॉईंट येथील हॉटेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. अशा शुल्लक कारणावरून जर मारहाण होत असेल, तर ती जिल्ह्याची बदनामी आहे. त्यामुळे या घटनेकडे पोलीस प्रशासनाने गांभीयनि बघावे.

मारहाण करणारे सर्व व्यक्ती या मुस्लिम समाजातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत धार्मिक सलोखा अबाधित राहिला आहे. परंतु, अशा व्यक्तीमुळे पुढे जाऊन धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा मुजोर लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. असे कृत्य पुन्हा घडू नये आणि कायद्याचा धाक राहावा म्हणून संबंधित स्टॉल, हॉटल बंद करण्यात यावे, जर संबंधित लोकांवर कारवाई झाली नाही व पुन्हा अशी घटना घडल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाला देत प्रशासनाकडून सदर घटनेसंदर्भात योग्य ती कडक कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्या भागात काही चुकीचे होत असल्यास कारवाई करावी.

लांजात स्मार्ट मीटर बसविण्यास उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून विरोध; जनतेमध्ये प्रचंड असंतोष

यासंदर्भात पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पोलीस प्रशासनाची भूमिका मांडताना सांगितले की, जिल्ह्याच्या पर्यटन या ओळखीला बाधा पोहचू नये. यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकारात बांधणे, काठीने मारहाण करणे, एकत्र येऊन माराहाण करणे अशी सर्व प्रकारची कलमे लावली आहेत. यात पोलिसांनी यात कोणतीही कुचराई केली नाही. पर्यटन व्यवस्था व व्यवसायाला बाधू पोहचू नये. ते स्टॉलबाबत आपण योग्य तो अहवाल पाठवू. तो स्टॉल अनधिकृत असेल तर आपण योग्य ती कारवाई करू. जेवढे कायदेशीर होईल तेवढे करू असे सांगितले. यावेळी विवेक पंडीत, शेखर नाडकर्णी, रमाकांत नाईक, धीरज परब, समीर सराफदार, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, दिनेश सावंत, हेमंत जाधव, सुधीर राऊळ, प्रसन्ना गंगावणे, बाळा पावसकर, रत्नाकर जोशी, चंदन कांबळी, शुभम देसाई, अरविंद करलकर, अमित सरनोबत व हिंदू बा़ंधव उपस्थित होते.

Web Title: The entire hindu society is aggressive in the zarap case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • Kudal
  • Sindhudurg News Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.