फोटो सौजन्य - Social Media
जमीर खलफे, रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एक वाद पेटून आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून याविरोधात पाऊले उचलली आहेत. मुळात, लांजा तालुक्यात हे प्रकरण घडून आले आहे. महावितरण विभागाने संपूर्ण लांजा तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु केले आहे. याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तीव्र पाऊले उचलत आहेत. महावितरणच्या या कामामुळे स्थानिक ग्रामीण जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मुळात, स्थानिक ग्रामीण जनतेला या गोष्टी पटल्याच नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
महावितरण तालुक्यात गावोगावी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम हाती घेतले आहे. स्मार्ट मीटर बसवण्यात आले कि सर्वात मोठे नुकसान हे मध्यम वर्गीय तसेच साधे आयुष्य जगणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांचे आहे. या स्मार्ट मीटरमुळे येणार खर्च प्रत्येकाला परवडणारा नाही. या स्मार्ट मीटरला वेळोवेळी रिचार्ज करणे तसेच दुरुस्त करणे, या गोष्टी ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्याला परवडणारे नाही. मुळात, ग्रामीण क्षेत्रात आजही इंटरनेटची सुविधा नाही आहे. त्यामुळे या स्मार्ट मीटरला रिचार करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशा अनेक कारणांमुळे स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या या कामांना विरोध दर्शवला आहे. याबाबत ग्रामस्थांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.
ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरण कडून जोर जबरदस्ती केली जात आहे ही कृती निषेधार्य असून ती त्वरित थांबवावी तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यास आपला जो प्रयत्न सुरू आहे या मनमानी कारभाराचा लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून स्मार्ट मीटर बसवण्याची कृती आपण त्वरित न थांबविल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आज लांजा येथील महावितरण विभागाला पत्राने देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणच्या कामाला नागरिकांचा प्रतिसाद आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घेण्यात आलेले ऍक्शन पाहून महावितरण पुढे काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सुरेश कंरबले उपस्थित होते. तर उपजिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, श्रीकृष्ण हेगिस्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.