hsc reult (फोटो सौजन्य social media)
12 वीच्या विद्यार्थ्यांची धडधड वाढली आहे. कारण पुढच्या काही तासात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तशी अधिकृतपणे माहिती दिली आहे. हा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार जाणून घ्या.
FSL मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी भरती जाहीर; लवकर करा अर्ज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Result 2025) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवारी म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत.
या संकेतस्थळावरही तुम्हाला पाहता येईल निकाल
असा पहा निकाल
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण https://maharesult.nic.in या आणि इतर संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत झाली होती.
बारावीच्या पुढील टप्प्यावर ‘या’ क्षेत्रांत घडवा करिअर; संधी मोठ्या आणि भविष्य उज्ज्वल