वर्धनगड : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी यात्रेनिमित्त भरणाऱ्या पुसेगाव येथे आठ जानेवारी सकाळी आठ वाजल्यापासून बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. मानाचे पहिले हिंदकेसरी मैदान भरघोस बक्षिसांची लय लूट तरी बैलगाडी शॉकेनानी याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख यांनी केले आहे.
यावर्षी पुसेगाव येथील मानाचे पहिले हिंदकेसरी मैदान सुंदर अशा धावपट्ट्या, निकालासाठी व पाहण्यासाठी पूर्ण परिसरात तसेच कॅमेरे व स्क्रीनची खास व्यवस्था केली आहे. बॅरिकेट्सह दोन्ही बाजूंना प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुसज्ज गॅलरी केली असून, या स्पर्धेसाठी श्री सेवागिरी हिंदकेसरी २०२४ बक्षिसाची लयलूट प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १ लाख २१ हजार, तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये, चतुर्थ क्रमांकसाठी ८१ हजार, पाचव्या क्रमांकासाठी ६१ हजार, सहाव्या क्रमांकासाठी ४१ हजार, सातव्या क्रमांकासाठी ३१ हजार, आठव्या क्रमांकासाठी २१ हजार नव्या क्रमांकासाठी ११ हजार व दहाव्या क्रमांकासाठी ७ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
गट विजेत्या प्रथम बैलगाडीसाठी सन्मानचिन्ह दिले जाईल, नियम व अटी पारदर्शक व शासकीय नियमाप्रमाणे राहतील त्याचबरोबर प्रवेश फी १६०० रुपये असून फिटनेस प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तरी राज्यातील बैलगाडी शौकीन आणि याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.