
अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडवर! राज्यातील हॉटेल्स, क्लबहाऊस, फार्महाऊस-रिसॉर्टस्ची होणार कडक तपासणी
मुंबई: नववर्षाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्री मित्र व कुटुंबासोबत स्नेहभोजन, पार्टीचे आयोजन करण्यात येते. असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, क्लबहाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्टस्मध्ये आयोजित केले जातात. नवीन वर्षाच्या उत्सवात नागरिकांना स्वच्छ, भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी मोडवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यभर ‘नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न ही मोहीम २४ डिसेंबर ते १० जानेवरीपर्यंत राबविण्यात येणार आहे. यात राज्यातील प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला त्यांच्या क्षेत्रातील पाच मोठी हॉटेल्स, पाच मध्यम-लहान हॉटेल्स, क्लबहाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्टस्ची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – istock)
अन्न व सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नमूद सुरक्षित अन्नासह स्वच्छता व इतर निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना सुरक्षित अन्न व स्वच्छ निकष पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे हस्ते छाननी समितीने निवड केलेल्या आस्थापनांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.
तीन मोठ्या आणि तीन मध्यम/लहान हॉटेल्स/आस्थापनांच्या तपासणीदरम्यान सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांसह उपस्थित राहतील. एका मोठ्या आणि एका मध्यम/लहान हॉटेल्स/आस्थापनांच्या तपासणीदरम्यान सह आयुक्त (अन्न) उपस्थित राहतील.मोहिमेदरम्यान गंभीर अनियमितता आढळल्यासच अन्नाचे नमुने घेतले जातील. तपासणीदरम्यान अस्वच्छ परिस्थिती, अपुरी जागा, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आदींशी संबंधित किरकोळ कमतरता आढळल्यास आस्थापनांना सुधारणा करण्याचे निर्देश दिले जातील.
अन्न सुरक्षा अधिकारी तपासणीदरम्यान कायद्यातील महत्त्वाचे कलमे आणि सुरक्षित अन्नाशी संबंधित सूचना असलेले पत्रके घेऊन संबंधित आस्थापनांना वाटतील. तपासणी दरम्यान, कालबाह्य झालेल्या कच्च्या मालाचा वापर, पनीरऐवजी चीज ऑनालॉगचा वापर (मेनू कार्डवर त्याचा उल्लेख न करता), आइस्क्रीमऐवजी गोठवलेल्या मिठाईची विक्री, खाद्यरंगांचा वापर, भेसळयुक्त आणि शिळे अन्न, हॉटेलची स्वच्छता आदी बाबी तपासल्या जातील.
तपासणीदरम्यान नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका आढळल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ आणि नियम २०११ अंतर्गत नियमानुसार अन्नाचे नमुने जागेवरच घेऊन कारवाई केली जाईल.या मोहिमेंतर्गत सर्व तपासणी केवळ ऑनलाइन पद्धतीने केली जाईल.या मोहिमेच्या संपूर्ण कारवाईचा गोळा केलेला अहवाल आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन सचिवांमार्फत मंत्र्यांच्या कार्यालयास पाठविण्यात यावा, असे आदेश देण्यात आले.
राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी सुरक्षित अन्न तयार करणे आणि पुरवठा करणे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यभरातील हॉटेल्स, क्लब हाऊसेस, फार्म हाऊसेस, होम स्टे, रिसॉर्ट्स इत्यादी ठिकाणी एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, ज्याचा उद्देश महाराष्ट्रातील लोकांना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न पुरवणे आहे. प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला तपासणीत स्वच्छतेपासून ते अन्नाच्या गुणवतेपर्यंत सर्व गोष्टीची तपासणी केली जाईल, उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
Navi Mumbai Election : नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार
Ans: अन्नातून होणारे आजार टाळणे आणि अन्न उत्पादनांची गुणवत्ता राखणे.
Ans: हा एक व्यापक कायदा आहे जो अन्न सुरक्षा मानके निश्चित करतो आणि गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार दंड (दिवाणी दंड आणि तुरुंगवास) देतो.
Ans: अन्न लवकर खराब होण्यापूर्वी फेकून द्या किंवा योग्य प्रकारे रेफ्रिजरेशन करा. स्वच्छतेवर लक्ष द्या.