Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati New: आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर! वसतिगृहांची अवस्था बिकट; विविध मुलभूत सुविधांपासून वंचित

अमरावतीमधील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक वर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. यामध्ये १८ वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये तर ६ वसतिगृहे भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 03:46 PM
आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर! वसतिगृहांची अवस्था बिकट; विविध मुलभूत सुविधांपासून वंचित

आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर! वसतिगृहांची अवस्था बिकट; विविध मुलभूत सुविधांपासून वंचित

Follow Us
Follow Us:

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असते. मात्र, शासकीय कागदपत्रांमधील योजना आणि जमिनीवरील वास्तव यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे जिल्ह्यातील चित्र स्पष्ट करीत आहे. जिल्ह्यातील आदिवासी व समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, येथील अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात वसतिगृहे चालविली जातात. यामध्ये १८ वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये तर ६ वसतिगृहे भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू

केवळ अमरावती शहरातच ९ वसतिगृहे असून तिथे हजारो विद्यार्थी राहतात. याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत अमरावतीत सुमारे १,६०० तर मोर्शी, वरुड, परतवाडा, चिखलदरा आणि धारणी यांसारख्या ग्रामीण भागांमध्ये १,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्य करून आहेत. मात्र, या वसतिगृहांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. इमारतींची दयनीय स्थिती, जागांची तीव्र कमतरता, आणि स्पर्धा परीक्षांच्या साहित्याचा वानवा यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

ग्रंथालयांमध्ये पुस्तके नाहीत, लेखनसामग्री वेळेवर मिळत नाही. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशच मिळत नसल्याने त्यांना नाइलाजाने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शासनाने उपाययोजना करून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी तीव्र मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.

दुसरीकडे, समाजकल्याण विभाग विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता आणि सर्व शासकीय सुविधा वेळेवर पुरवत असल्याचा दावा करीत आहे. परंतु, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, वारंवार आंदोलने व निदर्शने करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

Amravati New: सर्वेक्षणाच्या नादात शिक्षकच झाले शाळाबाह्य! शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणही करावे लागणार; मनस्ताप कायम

८८ आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, परंतु वसतिगृहांची क्षमता आणि सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. अमरावती शहरात मुला-मुलींसाठी तात्काळ नवीन वसतिगृहे बांधण्यात यावीत, भाड्याच्या इमारतींमधील सुविधा तातडीने सुधारल्या जाव्यात आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके व शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिले जावे, जेणेकरून निवासाच्या अभावामुळे कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही, अशी माहिती – अर्जुन युवनाते, विद्यार्थी नेता यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The future of tribal students hangs in the balance hostels are in a dire state students are deprived of various basic amenities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Amaravati
  • Tribal Areas
  • Tribal Community

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.