Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Weather Update: वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 04, 2025 | 05:28 PM
Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…
Follow Us
Follow Us:

1. अरबी समुद्रात निर्माण झाले ‘शक्ती’ चक्रीवादळ 
2. तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता
3. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई: ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’  या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या प्रादेशिक केंद्र, कुलाबा (मुंबई) येथून प्राप्त माहितीनुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळाने मागील सहा तासांत सुमारे आठ किलोमीटर प्रतितास वेगाने वायव्य दिशेने हालचाल केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता हे चक्रीवादळ २२.० अंश उत्तर अक्षांश आणि ६६.४ अंश पूर्व रेखांशाजवळ केंद्रित होते.

द्वारका (गुजरात) पासून सुमारे २८० किमी पश्चिमेला

नालिया पासून २९० किमी पश्चिम-नैऋत्येला

कराची (पाकिस्तान) पासून ३३० किमी दक्षिण-नैऋत्येला आणि

पोरबंदरपासून ३२० किमी पश्चिमेला

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ ४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ५ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम-नैऋत्येकडे सरकून उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल.

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

मच्छीमारांना सूचना: समुद्रात जाणे टाळा

भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्या आहेत की, पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व किनारी जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत की, या सूचनेची माहिती सर्व मच्छीमार आणि किनारी गावांतील नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचवावी. सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

मान्सून संपला असला तरी, देशाच्या अनेक भागात पाऊस सुरूच आहे. याचदरम्यान आता भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम जाणवू शकतो, ज्यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा परिणाम ४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवू शकतो.

Web Title: The increased threat of cyclone shakti arabian sea maharashtra rain weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • cyclone alert
  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update
  • Maharashtra Rain

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?
2

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.