राज्यावर येणार दुहेरी संकट (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात पावसाचा जोर वाढणार
देशातील अनेक राज्यांना चक्रीवादळाचा धोका
बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा
देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारताच्या तीनही बाजूला समुद्रकिनारा आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अलर्टबद्दल जाणून घेऊयात.
भारताच्या पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे देशातील अनेक राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात आणि देशात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
देशातील झारखंड, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे देशात अजूनही पावसाचे संकट कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी
IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी
समोर आलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ किनारपट्टीवरील ओडीशा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळचा वेग तशी 70 ते 75 कीमी प्रतीतास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागरिकांना सवधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
The #Depression over interior #Odisha moved north-northwestwards with a speed of 15 kmph during past 6 hours and lay centered at 0830 hrs IST of today, the 3rd October 2025 over the same region about 60 km west-northwest of Phulbani (Odisha)… pic.twitter.com/rnXasPfRBb — India Meteorological Department (@Indiametdept) October 3, 2025
राजधानी दिल्लीत देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज उत्तर प्रदेशमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. मात्र आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस उत्तराखंड राज्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.