“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला
मुंबई – मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. त्यामुळं महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. सीमा वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government) निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळत आहे. उद्रेकाचं वातावरण तयार झालं आहे.
[read_also content=”महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात महामेळावा घेणार… मुख्यमंत्री, शरद पवार राहणार उपस्थित https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-ekikaran-samiti-will-hold-a-meeting-in-belgaum-cm-and-sharad-pawar-will-be-present-352245.html”]
दरम्यान, आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. त्यामुळं महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यात वातावरण तापलं आहे, याचे पडसाद संसदीय अधिवेशनात देखील उमटले आहेत. याप्रश्नी केंद्राने दखल द्यावी असं विरोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान, बोम्मईंनी केलेली वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सीमावादाचा मुद्दा बोम्मईंनी बाहेर काढला असल्याची टिका मिटकरी यांनी केली आहे.
राज्याच्या अस्मितेचा मुद्दा बाहेर काढून लोकांच्या भावना भडकवणे व सीमावादावर लोकांची मने जिंकून त्याचा उपयोग मतात करुन घेणं हा अजेंडा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा आहे, म्हणून त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सीमावादाचा मुद्दा बोम्मईंनी बाहेर काढला आहे. आणि त्याच जोरावर त्यांना निवडणूक जिंकायची असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.