Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूनंतरही आदिवासींची हेळसांड! कुर्लोदमधील स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर

कुर्लोद परिसरातील आदिवासींना मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी सुविधा नाही; केवळ ३ स्मशानशेड असून, नवीन प्रस्ताव रखडलेले आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थ मूलभूत सुविधांसाठी अजूनही संघर्ष करत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 26, 2025 | 05:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्याच्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा व परिसरातील आदिवासी नागरिक मृत्यूनंतरही हलाखीचा सामना करत आहेत. संततधार पावसात मृतदेहांवर प्लास्टिकचे आच्छादन करून उघड्यावरच दहन करण्याची वेळ या भागातील रहिवाशांवर येते, हे शासनाच्या व्यवस्थेतील अपयशाचे ठळक उदाहरण आहे.

Sanjay Raut News: अमित शाहांच्या हाती महायुतीचा रिमोट कंट्रोल…; राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं

कुर्लोद ग्रामपंचायतच्या हद्दीत ११ गावपाडे असूनदेखील केवळ ३ ठिकाणीच स्मशानभूमीची सोय आहे. मागील आर्थिक वर्षात शेरेचापाडा, रायपाडा, जांभूळपाडा येथे स्मशानभूमीची निकड स्पष्ट असूनही केवळ दोनच ठिकाणी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवले गेले. विशेष म्हणजे हे प्रस्ताव अद्यापही आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत.

दरवर्षी शासनाकडून ग्रामपंचायतींना विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात गरजेच्या ठिकाणी तो निधी वापरण्याऐवजी, गावपंचायत प्रशासन आणि स्थानिक नेत्यांचे व्यक्तिगत लाभाचे समीकरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे अत्यंत आवश्यक आणि मूलभूत सुविधा देखील मागे पडतात. ११ गावांमध्ये फक्त ३ स्मशान शेड हे याचेच उदाहरण आहे.

या प्रश्नावर ग्रामपंचायत अधिकारी निखील बोरसे यांनी स्पष्ट केले की, सन २०२४-२५ मध्ये दोन गावांचे प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून पाठवले गेले होते, मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे प्रस्ताव रखडले आहेत. तर सरपंच मोहन मोडक यांनी यावर्षी बहुतेक गावांमध्ये स्मशानभूमी शेड मंजूर व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे.

पुण्याची अधोगती होईर्यंत अजित पवार अन् सरकार झोपा काढत होते का? काँग्रेसचा संतप्त सवाल

मात्र, आश्वासने कितीही दिली गेली, तरी प्रत्यक्षात मृत्यूनंतरही आदिवासी बांधवांना ज्या अतीव वेदना सहन कराव्या लागत आहेत, त्या दुर्दैवी आहेत. उघड्यावर, प्लास्टिकमध्ये गुंडाळून होणारे अंत्यसंस्कार केवळ सामाजिक विषमताच नव्हे, तर माणुसकीलाही काळिमा फासणारे चित्र आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून, प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून कामास गती द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Web Title: The issue of the cemetery in kurlod is serious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी
1

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
2

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम
3

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!
4

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.