Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Palghar Accident : विक्रमगड येथील एका रबर फॅक्टरीच्या स्टोअर रुमची भिंत कामगारांवर कोसळून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही स्थानिक असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरू केला आहे,

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 03:56 PM
Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली... अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली... अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पालघर जिल्ह्याच्या विक्रमगडमधील घटना
  • जखमींना तातडीने रुग्णालयात नेले
  • घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरू
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड स्थित गुरुवारी एका रबर कंपनीच्या स्टोअर रुमची भिंत कोसळून झालेल्या अपघातात (Palghar Accident) त्यात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाडा पोलीस क्षेत्रातील विक्रमगड रोड स्थित टीना रबर कंपनीत ही घटना घडली. सध्या पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजता हे कामगार नाश्ता करत होते. तेव्हा त्यांच्या बाजूला असलेली भिंत अचानक कोसळली. ज्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. जवळ उपस्थित इतर लोकांनी तातडीने ढिगारा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश

मृतांची ओळख पटली असून यात दोन महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये विक्रमगडच्या मोहा गावातील केशव वालकु गुनगुणा, विक्रमगडच्या वसूरीमधील मीरा जानू गवळी आणि वाडाच्या कोंब पोशेरी येथील रंजना दिलीप कोंब यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तीनही मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले असून या घटनेची त्यांनी नोंद केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसला आग

याआधी गुरुवारी सकाळी पनवेल जवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. बसमध्ये एकूण 14 प्रवाशी होते. सर्व प्रवाशी सुखरूप असून घटनेनंतर त्यांना दुसऱ्या बसमधून गंतव्य स्थानी रवाना करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका बसने अचानक पेट घेतला. आग लागल्याची घटना कळताच सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून उतरवण्यात आले. सोबतच चालकाने पोलीस व अग्निशमन दलाला तातडीने घटनेची माहिती कळवली.

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

पनवेल महानगरपालिका व खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, ही आग एवढी भीषण होती की, संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

Web Title: Palghar accident rubber factory three worker death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Accident
  • Death
  • palghar

संबंधित बातम्या

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
3

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.