Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या नराधमास २७ वर्षांचा कारावास, सहा वर्षाच्या बालकावर केले होते अनैसर्गिक कृत्य

सहा वर्षाच्या पिडीत बालकाने आपल्या आईला सांगितले की, घरी असताना आरोपी दिनेश नंदेश्वर याने त्याचे कपडे काढून अनैतिक अत्याचार केला. दरम्यान, पिडीत बालकाच्या अंगावर जखम व रक्त लागलेले दिसून आले. याबाबद फिर्यादीने अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 12, 2022 | 11:44 AM
The man was sentenced to 27 years in prison and a six-year-old boy was charged with aggravated assault

The man was sentenced to 27 years in prison and a six-year-old boy was charged with aggravated assault

Follow Us
Follow Us:

गोंदिया : अर्जुनी मोरगाव येथील सहा वर्षाच्या बालकासोबत अनैतिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी त्या नराधम आरोपीस २७ वर्षाचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा ठोठावली. दिनेश भिकाजी नंदेश्वर (वय ३०) रा. अर्जुनी मोरगाव असे त्या नराधमाचे नाव आहे.

अर्जुनी मोरगाव येथील पिडीत मुलाची आई नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामावरून घरी आल्यावर सहा वर्षाच्या पिडीत बालकाने आपल्या आईला सांगितले की, घरी असताना आरोपी दिनेश नंदेश्वर याने त्याचे कपडे काढून अनैतिक अत्याचार केला. दरम्यान, पिडीत बालकाच्या अंगावर जखम व रक्त लागलेले दिसून आले. याबाबद फिर्यादीने अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीची दखल घेवून तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रकरणात आरोपी विरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार तसेच पिडीत / फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सतीश यु. घोडे व विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी न्यायालयासमोर एकूण १० साक्षदारांची साक्ष नोंदवून घेतली.

वैद्यकीय पुरावा व न्यायालयासमोर आलेली परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता तसेच आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादानंतर न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी आरोपीविरूद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला २० वर्षाचा सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त कारावास तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत ७ वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी एकूण २७ वर्षे व ३० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा ठोठावली. सदर दंडाची रक्कम पिडीत बालकाला देण्याचे न्यायालयाने आदेश केले. त्याचप्रमाणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियामार्फत पिडीत बालकाला मनोधर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत व पुनर्वसन करण्याचे आदेश केले आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी पोलिस हवालदार गीता ठाकूर, तुरकर यांनी उत्कृष्ट काम पाहिले.

Web Title: The man was sentenced to 27 years in prison and a six year old boy was charged with aggravated assault nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2022 | 11:44 AM

Topics:  

  • decision of court
  • gondia news

संबंधित बातम्या

NCERT Syllabus Change: ९ वीच्या नवीन पुस्तकात न्यायव्यवस्थेचे तोंडभरून कौतुक; ‘या’ वादग्रस्त प्रकरणानंतर केला मोठा बदल
1

NCERT Syllabus Change: ९ वीच्या नवीन पुस्तकात न्यायव्यवस्थेचे तोंडभरून कौतुक; ‘या’ वादग्रस्त प्रकरणानंतर केला मोठा बदल

Gondia Nursing Colleges SOP: राज्यातील सर्व नर्सिंग कॉलेजेसमध्ये लागू होणार ‘SOP’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा!
2

Gondia Nursing Colleges SOP: राज्यातील सर्व नर्सिंग कॉलेजेसमध्ये लागू होणार ‘SOP’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.