Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘श्री सेवागिरी महाराज की जय’च्या जयघोषात पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

पुसेगाव ता.खटाव येथील प पू श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सुरुवात पालखी व मानाचा झेंड्याच्या भव्य मिरवणूकीने, "श्री सेवागिरी महाराज की जय" च्या जयघोषात, ढोल-ताशा, लेझीम, बँडपथक, तुतारी व झांजपथक , यांच्या निनादात मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात झाली.

  • By Aparna
Updated On: Jan 07, 2024 | 02:59 PM
‘श्री सेवागिरी महाराज की जय’च्या जयघोषात पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ
Follow Us
Follow Us:

वर्धनगड : पुसेगाव ता.खटाव येथील प पू श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सुरुवात पालखी व मानाचा झेंड्याच्या भव्य मिरवणूकीने, “श्री सेवागिरी महाराज की जय” च्या जयघोषात, ढोल-ताशा, लेझीम, बँडपथक, तुतारी व झांजपथक , यांच्या निनादात मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात झाली.

शनिवार दि ६ ते १६ जानेवारी या कालावधीत येथील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात व सातारा पंढरपुर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे. या यात्रेस महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात व आंध‘ प्रदेशसह इतर राज्यांतून नऊ ते दहा लाख भाविक मोठ्या संख्येने येतात.

श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, आ महेश शिंदे, पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव विश्वस्त डॉ सुरेश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता मानाचा झेंडा व श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणूकीला मंदीरापासून सुरुवात झाली. भाविक-भक्त व ग्रामस्थांनी जागोजागी मानाचा झेंडा व पालखीचे मनोभावे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराज की जय च्या घोषणा दिल्या.

मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीच्या मिरवणूकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री सेवागिरी विद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडीयम स्कूल, या शाळांचे विद्यार्थी, झांजपथक व लेझीमपथके सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करुन लेझीम, झांजपथक, सामाजिक देखावे लक्षवेधक ठरले.

मिरवणुकी नंतर मानाचा झेंडयाची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

Web Title: The pusegaon yatra started with enthusiasm with the chanting of sri sevagiri maharaj ki jai nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

‘मराठी मुंबई नाही ‘मुस्लिम मुंबई’ होणार…’, किरीट सोमय्यांचा सर्वात मोठा दावा, वाढत्या लोकसंख्येवरून दिला धोक्याचा इशारा
1

‘मराठी मुंबई नाही ‘मुस्लिम मुंबई’ होणार…’, किरीट सोमय्यांचा सर्वात मोठा दावा, वाढत्या लोकसंख्येवरून दिला धोक्याचा इशारा

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी
2

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा
3

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

Ashadhi Wari 2026: पंढरी वारीतील अनोळखीवर वॉच! सुरक्षा कलम १६३ लागू; भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
4

Ashadhi Wari 2026: पंढरी वारीतील अनोळखीवर वॉच! सुरक्षा कलम १६३ लागू; भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.