Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2026 | 03:12 PM
पुणे-बेंगळुरू महामार्गावर डी-मार्टसमोर; भीषण अपघात

पुणे-बेंगळुरू महामार्गावर डी-मार्टसमोर; भीषण अपघात

Follow Us
Follow Us:

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हलरने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी वाहनातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना धडकेचा मोठा फटका बसला. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ (बापू) कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जखमींची नावे मात्र समजू शकली नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

Ride Malfunction : हवेत 3 तास मृत्यूशी झुंज! न्यूयॉर्कच्या नामांकित पार्कमध्ये थरारक अपघात; मुलांनी Apple Watch वरून मागितली मदत

दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून बचावकार्य हाती घेतले. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, सकाळच्या वेळेत काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, चालकाची झोप अथवा अन्य तांत्रिक कारणे याबाबत तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Horrific accident on pune bengaluru highway two died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Accident News
  • Satara News

संबंधित बातम्या

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला
1

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
2

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
3

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Satara News: वेताळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न; डिजिटल शाळा, सीसीटीव्ही आणि घरकुल योजनेच्या प्रस्तावांना प्राधान्य
4

Satara News: वेताळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न; डिजिटल शाळा, सीसीटीव्ही आणि घरकुल योजनेच्या प्रस्तावांना प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.