Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

सकाळी आपला मावळाचे टी-शर्ट घातलेले हजारो युवक-युवती फावडे, कुदळ, झाडू घेऊन 'जय शिवराय ! च्या घोषात गडाकडे रवाना झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2025 | 01:39 PM
गडरक्षण हीच खरी शिवसेवा : खासदार छत्रपती शाहु महाराज

गडरक्षण हीच खरी शिवसेवा : खासदार छत्रपती शाहु महाराज

Follow Us
Close
Follow Us:

गारगोटी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष करून चालणार नाही, तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे, असा प्रभावी संदेश खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी किल्ले भुदरगड येथे दिला.

खासदार निलेश लंके यांच्या संघटनेतर्फे सुरू असलेल्या गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या मोहिमेचा शुभारंभ खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार जयंत पाटील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, गडांवरील स्वच्छता, मंदिरे दुरुस्ती, सूचना फलक बसविणे हे छोटे पण प्रभावी उपक्रम आहेत. पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सशक्त गड सोडून जाण्याचे कार्य निलेश लंके करत आहेत. शिवरायांच्या विचारांना लोकांच्या मनात रुजवण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत. ‘आपला मावळा’ ही संघटना भविष्यात लाखो मावळ्यांना घेऊन शिवकार्याच्या रणांगणात उतरलेली पाहायला मिळेल, असा मला विश्वास आहे.

खासदार निलेश लंके यांनी यावेळी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला. त्यांनी मावळ्यांसमोर सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून भाषणांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व आहे. शिवनेरीपासून सुरू झालेली ही मोहीम धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड पार करत आता भुदरगडवर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा हा वारसा अखंड राहावा म्हणून हा उपक्रम आहे. लंके यांनी सरकारकडून गडसंवर्धनासाठी विशेष निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

सकाळी आपला मावळाचे टी-शर्ट घातलेले हजारो युवक-युवती फावडे, कुदळ, झाडू घेऊन ‘जय शिवराय ! च्या घोषात गडाकडे रवाना झाले. कचरा निर्मूलन, झुडपांची छाटणी, वृक्षारोपण, बाके, डस्टबिन, सौरदिवे बसविणे अशा अनेक उपक्रमांनी गड परिसर स्वच्छ व आकर्षक झाला.

खासदार लंके यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन हजारो मावळे या उपक्रमात सहभागी होते. मात्र, यावेळी त्यांनी कोणताही दिखावा न करता आपल्या कार्यकर्त्यांसह पुष्पनगर येथील माध्यमिक शाळेत मुक्काम केला. पहाटे त्यांनी मावळ्यांसह जयघोषात गडाकडे प्रस्थान केले. त्यांचा हा साधेपणा आणि जमिनीशी जोडलेला स्वभाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

लंके तरुणवर्गात लोकप्रियतेच्या शिखरावर

गडसंवर्धन मोहिमेमुळे खासदार लंके तरुणवर्गात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. भुदरगडवर त्यांनी भेट दिल्यानंतर तरुणांनी सेल्फीसाठी मोठी गर्दी केली आणि लंकेसाहेबांसोबतचा एक फोटो हा दिवसाचा ट्रेंड बनला.

Web Title: The responsibility of protecting and preserving forts lies with every marathi person says mp shahu maharaj chhatrapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Local Body Elections: बीडमध्ये शिवसेनेने फुंकले रणशिंग! नगरपरिषदांसाठी आखला मास्टरप्लॅन
1

Local Body Elections: बीडमध्ये शिवसेनेने फुंकले रणशिंग! नगरपरिषदांसाठी आखला मास्टरप्लॅन

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस…”; ‘या’ नेत्याने ‘उबाठा’चं सगळंच बाहेर काढलं
2

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस…”; ‘या’ नेत्याने ‘उबाठा’चं सगळंच बाहेर काढलं

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
3

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
4

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.