Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचा अनेक ठरावांनी समारोप

अनेक महत्त्वपूर्ण ठराव संमत करून भारतीय लोकशाही, संविधान यांचे ठामपणे संरक्षण करणे व देशातील वाढती हुकूमशाही व धर्मांधता यास कठोर विरोध करणे, यांचा त्यात समावेश आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 30, 2024 | 11:23 AM
दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचा अनेक ठरावांनी समारोप
Follow Us
Close
Follow Us:

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने कणकवली येथील आ. सो. शेवरे साहित्य नगरीत दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी पार पडलेल्या दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप पार पडला. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण ठराव संमत करून भारतीय लोकशाही, संविधान यांचे ठामपणे संरक्षण करणे व देशातील वाढती हुकूमशाही व धर्मांधता यास कठोर विरोध करणे, यांचा त्यात समावेश आहे. विविध कार्यक्रमाने संगीताचा रविवारी समारोप झाला.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दोन दिवसांपासून मराठा नाट्यगृह कणकवली येथे आ. सो. शेवरे साहित्य नगरीत दुसर्‍या सम्यक साहित्य कला संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतीच्या समारोप प्रसंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज. वि पवार, संगीतीच्या अध्यक्षा लेखिका उर्मिला पवार, कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, उपाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे, लेखक रमाकांत जाधव, प्रबोधिनीचे सरचिटणीस संदेश पवार, सुनील हेतकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, लेखक डॉ. श्रीधर पवार, स्वागताध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी समारोप करताना प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा.आनंद देवडेकर यांनी दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या निमित्ताने संमत केलेल्या ठरावांचे वाचन केले. ठराव पुढीलप्रमाणे-

१. ही संगीती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध करते.
२) ही संगीती भारतीय संविधानात अधोरेखित करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष ढाच्याच्या संरक्षणास्तव कटीबद्ध असल्याचा उद्घोष करते.
३) ही संगीती अपरान्तातील बौद्ध वारसा जतन करण्याचा संकल्प करते.
४) ही संगीती ब्राह्मी लिपी(धम्मलिपी) व पाली भाषेच्या प्रचार प्रसाराचा पुनरुच्चार करते.
५) ही संगीती अपरान्त प्रदेशात बौद्ध धम्माचा प्रचार
प्रसार गतिमान करण्यासाठी प्रभावी व पूरक साहित्य निर्मितीचा निश्चय करते. या प्रमुख ठरावांसह इतर काही ठराव करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता तानाजी खरावतेकर मंचावर ‘जलसा टू रॅप’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व शाहीर तथा प्रबोधिनीचे राष्ट्रपाल सावंत यांनी आंबेडकरी जलशाचे सादरीकरण केले, तर युवकांचा प्रतिनिधी येशु उर्फ यश धर्मपाल सकपाळ यांनी स्वलिखित रॅप गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी तर आभार दीपक कांबळे यांनी मानले. त्यानंतर अकरा वाजता कथा वाचन – अभिवाचन हा कार्यक्रम मनोहर कदम मंचावर पार पडला. त्यात कल्पना मलये यांनी उर्मिला पवार यांची चौथी भिंत कथा संग्रहातील ‘कवच’ ही कथा, लेखक रमाकांत जाधव यांनी सके या कथा संग्रहातील स्वतःची ‘बुद्धाचा मेहुणा’ ही कथा, सुनील हेतकर यांनी ‘इस्तव’ संग्रहातील हिपपाॅप-रॅपवर आधारित ‘फेमज्वर’ ही कथा आणि निलेश पवार यांनी सिद्धार्थ देवधेकर यांची ‘न सांगितलेली गोष्ट’ मधील ‘बॉय’ या कथेचे सुंदर प्रकारे अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश लोखंडे यांनी तर आभार प्रा. संतोष वालावलकर यांनी केले.

दुपारी नाटककार अरुण कदम, बुद्धदास कदम व सिनेअभिनेता संदेश जाधव यांची प्रकट मुलाखत अभिनेते अशोक चाफे यांनी घेतली. या मुलाखतीतून त्यांचा कलाक्षेत्रातला दीर्घ प्रवास व त्यामधील अनेक अनुभव यांचे संचित त्यांनी उलगडून दाखवले. या कार्यक्रमाचे आभार प्रकाश तेंडुलकर यांनी मानले.

दुपारनंतर झालेल्या बा. स. हाटे मंचावर ‘साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या परिसंवादात कवी प्रा. प्रवीण बांदेकर, नाटककार अरुण कदम व प्रा. शिवराज गोपाळे यांनी मांडणी केली. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अाशालता कांबळे होत्या. या परिसंवादातून सर्वच मान्यवरांनी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा इतिहास सांगतानाच मराठी साहित्य समीक्षेची परिभाषा आणि आंबेडकरी साहित्याची परिभाषा वेगळी असल्याची जाणीव या निमित्ताने करून दिली. आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्याला नवे निकष लावावे लागतील, शिवाय नव्या काळात आंबेडकरी साहित्य प्रवाहात नवे समीक्षक उदयाला येत असल्याची जाणीवही अाशालता कांबळे यांनी करून दिली.

शेवटच्या सत्रात दलित पॅंथरचे संस्थापक ज. वी. पवार यांची प्रकट मुलाखत डॉ. श्रीधर पवार व संदेश पवार यांनी घेतली. या मुलाखतीतून ज. वी. पवार यांनी आपल्या समग्र जीवनाचा आढावा उपस्थितांसमोर मांडताना भविष्यकालीन आपले संकल्प, योजना यांची माहिती करून दिली. नव्या पुस्तकांची आखणी करीत असल्याचे त्यांनी सांगून वाचकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गमरे व आभार आनंद तांबे यांनी मानले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला साहित्यिक रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Web Title: The second samayak sahitya kala sangeet concludes with several resolutions maharashtra government indian democracy constitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • Indian Democracy
  • Kankavli
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.