Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे राज्य शासनाचे आवाहन!

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील एकूण 73 तीर्थ क्षेत्रे  आणि महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या  योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. जाणून घ्या पात्रता निकष

  • By नारायण परब
Updated On: Sep 10, 2024 | 10:36 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण 73 तीर्थ क्षेत्रे  आणि महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या  योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी  ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

हे देखील वाचा- अटल बांधकाम कामगार आवास योजना: जागा खरेदीसाठी बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन  योजनेचे लाभ स्वरूप

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे. निवड झालेल्या   व्यक्तीला निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या लाभामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती ज्येष्ठ व्यक्ती 30 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली असून  हा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा- सांगलीतील सर्व शाळांमध्ये ३० सप्टेंबर पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करा! पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे निर्देश

पात्रतेचे निकष

  • योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • वय वर्षे 60 व त्यावरील व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकतात.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि, रूपये 2 लाख 50 हजार पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा. चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे, लाभार्थी प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अधिक माहितीसाठी  अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.

Web Title: The state government appeals to senior citizens to apply for the mukhyamantri tirtha darshan yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 10:36 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Senior Citizens

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!
1

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांत ‘लाडक्या बहिणी’; सरकारवर वाढतोय आर्थिक बोजा
2

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांत ‘लाडक्या बहिणी’; सरकारवर वाढतोय आर्थिक बोजा

लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…
3

लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.