Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत्याधुनिक बारामती बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू; विमानतळाप्रमाणे रचना

आधुनिक स्वरूपातील उभारण्यात आलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बारामती बसस्थानक गुरूवारपासून (दि ७)प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 07, 2024 | 07:50 PM
आत्याधुनिक बारामती बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू; विमानतळाप्रमाणे रचना
Follow Us
Close
Follow Us:

बारामती: संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आधुनिक स्वरूपातील उभारण्यात आलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बारामती बसस्थानक गुरूवारपासून (दि ७)प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले. वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना असलेल्या बारामती बस स्थानकाची इमारत एखाद्या विमानतळाप्रमाणे आकर्षक व देखणी झाली असून ही इमारत पाहण्यासाठी प्रवाशांसह नागरिकही मोठी गर्दी करत आहेत. या बस स्थानकातील कामकाजाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली.

सुमारे ५० कोटी रुपये खर्चुन हे बसस्थानक उभारण्यात आले असून या बसस्थानकाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या अत्याधुनिक बस स्थानकाची प्रतीक्षा बारामतीकरांना होती. अधिकृतरित्या या बस स्थानकाचे कामकाज आजपासून सुरू झाल्याने प्रवाशांसह राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या बसस्थानकाचा संपूर्ण परिसर सुंदर आणि कल्पकतेने उभारला आहे. जागेचे एकूण क्षेत्रफळ २४ हजार ७४८ चौ.मी. आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर बस स्थानक कार्यालय, तळमजल्यावर आगार आणि पार्सल कक्ष असे बांधकाम करण्यात आलेले आहे. बसेस उभे राहण्यासाठी २२ फलाट उभारण्यात आले असून तळमजल्यावर २२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर २१ कार्यालये, १२३ आसनी परिसंवाद कक्ष, ३६ आसनी बैठक व्यवस्था आणि ३२ आसनी शयनकक्ष आहेत.

या बसस्थानकात ६५ बस, ४७ चारचाकी, ४० ॲटोरिक्षा आणि ११७ दुचाकी वाहनाकरीता वाहनतळाची निर्मिती करण्यात येत आहे. परिसराचे बाह्य सुशोभिकरण,फर्निचर तसेच प्रवाशांकरीता सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहे. बारामती शहराच्या वैभवात या बसस्थानकामुळे भर पडली आहे.

एकाच वेळेस २२ फलाटांवर बसेस उभ्या राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रतिक्षेसाठी प्रत्येक फलाटाच्या बाजूला बैठक व्यवस्था देण्यात आली असून अतिशय प्रशस्त स्वच्छतागृहांचीही सुविधा देण्यात आली आहे. महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असून दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा देण्यात आली आहे.बसस्थानकाच्या वरील बाजूस एसटी बँकेस जागा देण्यात आली असून दोनशे आसनक्षमतेचा एक मोठा व ५० आसनक्षमतेचा एक छोटा असे दोन मिटींग हॉल करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिका-यांच्या वास्तव्यासाठी दोन सुसज्ज सूट तयार करण्यात आले आहेत. चालक व वाहकांच्या विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एक ओपन व अंतर्गत असे सुंदर उपहारगृह तयार करण्यात आले असून व्यावसायिक गाळेही येथे तयार करण्यात आले आहेत. बस स्थानकाच्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून २४ तास या बस स्थानकात पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना देखील कक्षाची सोय करण्यात आली आहे.

बारामतीच्या बसस्थानकावरुन गुरुवारपासून अधिकृतपणे एसटीची वाहतूक सुरु झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी या बसस्थानकाच्या आधुनिक रचनेचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून हे अत्याधुनिक बस स्थानक उभे राहिले असून या बस स्थानकात तरुण वर्गासह अबाल वृद्ध देखील आवर्जून सेल्फी काढत आहेत. या आधुनिक बस स्थानकाच्या निर्मितीचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले जाते. या बस स्थानकाच्या पायाभरणीपासून उपमुख्यमंत्री पवार यांनी वारंवार कामाची पाहणी करून ठेकेदारांना विविध सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार या बस स्थानकाच्या आधुनिक इमारतीमध्ये रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशात पहिलेच आधुनिक बस स्थानक बारामती मध्ये निर्माण झाल्याने हे व स्थानक संपूर्ण देशात आयडॉल ठरणार आहे.

Web Title: The state of the art baramati bus station in the country will join the service of passengers structured like an airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2024 | 07:50 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
1

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला
2

बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक
3

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…
4

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.