आता ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार 'परीक्षा'; गुरुजी तणावात
नागपूर : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत. ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू करून 24 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार होती. यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच करण्यात नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासंदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेली घोषणा म्हणजे केवळ हवेतील करार आहे, असे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले (Sudhkar Adbale) यांनी मत व्यक्त केले.
आ. अडबाले यांनी रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची पदोन्नती, विस्तार अधिकारी व सहायक शिक्षक यांची भरती, जिल्हा परिषदेच्या निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती यासंबंधात 7 जुलै रोजी जारी करण्यात आलेला परिपत्रक रद्द करण्याच्या निर्णयाकडेही आ. अडबाले यांनी लक्ष वेधले होते.
अडबाले यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट निश्चित केलेली तारीख निघून गेली. परंतु अद्याप पोर्टल सुरू करण्यात आले नाही. सरकार पोर्टल सुरू करण्यात अपयशी ठरले आहे. शिक्षण विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या युवकांमध्ये नाराजीचा सुरू उमटला आहे. त्यामुळे घोषणा केल्यानुसार भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी अडवाले यांनी यावेळी केली.
उत्तरादाखल शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘शिक्षक भरतीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेली स्थगिती आता हटविली आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यानुसार आता शिक्षकांची भरती करण्यात येईल अशी घोषणा केसरकर यांनी केली’.